मुंबईतील रस्त्यावर एक माणूस गात होता 'गदर' चं 'घर आजा परदेसी' गाणं, दिग्दर्शकानं ऐकलं अन् थेट...Gadar 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gadar 2

Gadar 2: मुंबईतील रस्त्यावर एक माणूस गात होता 'गदर' चं 'घर आजा परदेसी' गाणं, दिग्दर्शकानं ऐकलं अन् थेट...

Gadar 2: सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 'गदर एक प्रेम कथा' सिनेमानं बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. सिनेमातील गाण्यांपासून अॅक्शपर्यंत सर्वच लोकांना पसंत आलं होतं. सिनेमातील डायलॉग तर सगळ्यांच्या तोंडावर असायचे.

आता पुन्हा ११ ऑगस्टला या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज होत आहे. नुकतेच सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले होते,ज्यात तारा सिंग आणि सकीना रोमॅंटिक अंदाजात पुन्हा एकदा दिसले. यादरम्यान आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे,ज्यात एक व्यक्ति 'गदर' मधलं 'घर आजा परदेसी गाणं' गाताना दिसत आहे.

काही दिवस आधी गदरचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एक व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला होता. व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं होतं की, ''काल रात्री मी एका मीटिंग नंतर कार्टर रोडवरनं जात होतो,खूप जुन्या आठवणी मनात येत होत्या तेवढ्यात चालता चालता आणखी एक आठवण मनात येऊन गेली. एक वृद्ध माणूस याच रस्त्यावर गात बसला होता..'गदर' चं हे गाणं...आम्ही आनंद घेतला..आता तुम्ही सुद्धा आनंद लूटा''.(Gadar 2 'ghar aaja pardesi' song memory shared by director anil sharma)

व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात एक वृद्ध व्यक्ती 'गदर'चं 'घर आजा परदेसी' गाणं गाताना दिसत आहे. तो माणूस गाण्याचा पूर्ण आनंद लुटताना दिसत आहे. गाणं ऐकून अनिल शर्मा त्याची प्रशंसा करतात आणि त्याच्याशी गप्पा देखील मारतात.

या व्हिडीओवर युजर्स आता प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं लिहिलं आहे,'गदर २ ब्लॉकबस्टर ठरणार'. तर आणखी एका युजरनं लिहिलं आहे,'सर,'गदर' बॉलीवूडचा सगळ्यात मोठा सिनेमा होता. त्यामुळे लोकांना सिनेमाची प्रत्येक गोष्ट लक्षात आहे'.

तर आणखी एकानं कमेंट करत लिहिलं आहे,'आता 'गदर २' ची आम्ही वाट पाहत आहोत'.

गदरचं एक गाणं,'उड जा काले कावा..'जे इतकं लोकप्रिय झालं होतं,त्याला मॉडिफाय करत सीक्वेल देखील 'गदर २' मध्ये ठेवण्यात आला आहे.

एका सूत्रानं सिनेमा संदर्भात सांगितलं की,''उड जा काले कावा हे 'गदर अॅन्थम' सारखं आहे, हे गाणं तारा आणि सकीनाची प्रेम कहाणी आणि आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याच्या त्यांच्या इच्छेला दर्शवतं.' गदर २' याच्याविना अपूर्ण आहे''.

या गाण्याला प्रीती उत्तम,उदित नारायण आणि निहार एसनं आपला आवाज दिला आहे. उत्तम सिंगनं याला संगीत दिलं होतं आणि आनंद बक्षी यांचे शब्द होते.