Gadar 2 Box Office Collection: तारा सिंगचा हातोडा असा चालला की सर्वांचा रेकॉर्ड मोडला... गदर 2 ची विक्रमी कमाई

सनी देओलच्या गदर 2 च्या कमाईचा नवीन विक्रमी आकडा समोर आलाय
gadar 2 latest box office collection soon cross 600 cr in box office
gadar 2 latest box office collection soon cross 600 cr in box officeSAKAL

Gadar 2 Box Office Collection: सनी देओलच्या गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलाच गदारोळ माजवलाय. सनी देओलच्या गदर 2 सिनेमाची बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केलीय.

सनी देओलच्या गदर 2 च्या कमाईचा नवीन आकडा समोर आलाय. यात गदर 2 ने ६०० कोटींचा आकडा पार केल्याचं बोललं जातंय.

(gadar 2 latest box office collection soon cross 600 cr in box office)

gadar 2 latest box office collection soon cross 600 cr in box office
Swara Bhaskar: झाडांची सावली अन् नव्या पाहुण्याची चाहूल; स्वरा भास्करने बेबी बंप दाखवत केलं खास फोटोशूट

सनी देओलच्या गदर 2 ची बॉक्स ऑफीसवर विक्रमी कमाई

बॉक्स ऑफिस स्टॅटिस्टिक्स शेअरिंग साइट sacnilk च्या अहवालानुसार, 'गदर 2' ने तिसर्‍या वीकेंडला भरपूर कमाई केली आहे, तिसरा सोमवार देखील वाईट गेला नाही. चित्रपटाच्या कमाईच्या सुरुवातीच्या आकड्यांमध्ये असे सांगण्यात आले आहे की 'गदर 2' तिसऱ्या सोमवारी फक्त 5 कोटी रुपयांनी कमी झाला आहे. या चित्रपटाने 4.50 कोटींची कमाई केली आहे. 18 दिवसांत 460.55 कोटी रुपये कमावले आहेत.

गदर 2 पाहायला गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

गदर-२ चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील थिएटरमध्ये गदर-२ चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

32 वर्षीय अक्षत तिवारी हा तरुण शनिवारी संध्याकाळी 7.50 वाजता सनी देओलचा नुकताच प्रदर्शित झालेला 'गदर-2' चित्रपट पाहण्यासाठी फन सिनेमागृहातगेला होता.

त्यावेळी तो फोनवर कोणाशी तरी बोलत असतांनाच सिनेमा हॉलच्या गेटवर त्यााला हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

आणि बोलता बोलता अचानक तो जमीनीवर कोसळला. त्याला तेथील लोकांनी तातडीने रुग्णालयात नेले मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गदर 2 चं संसदेत खास स्क्रीनींग

गदर २ मधील प्रमुख अभिनेत्री अमिषा पटेलनं तिच्या इंस्टा अकाउंटवरुन ही पोस्ट शेयर केली होती. त्यात तिनं म्हटलं आहे की, गदर २ ही आता संसदेत सलग तीन दिवस दाखवली जाणार आहे. २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान त्याचे खास स्क्रिनिंग आयोजित केले जाणार आहे. याशिवाय एका ट्रेड अॅनालिस्टनं देखील याविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यानं म्हटलं आहे की, संसदेतील सदस्यांसाठी हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com