Gadkari Movie: सुपरमॅन नाही आता येणार 'हायवे मॅन', केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर येणार सिनेमा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आगामी सिनेमाची घोषणा झालीय
gadkari marathi movie based on life of union minister nitin gadkari
gadkari marathi movie based on life of union minister nitin gadkari SAKAL

मराठी सिनेमात धर्मवीर सिनेमाने आनंद दिघेंची कहाणी आपल्यासमोर मांडली. धर्मवीर सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केली. आता आणखी एका राजकारणी माणसावर सिनेमा येतोय. ते म्हणजे नितीन गडकरी.

नितीन गडकरी… देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणारे राजकारणी म्हणजे नितीन गडकरी. आता नितीन गडकरींच्या आयुष्यावर गडकरी नावाच्या मराठी सिनेमाची घोषणा झालीय

gadkari marathi movie based on life of union minister nitin gadkari
Mission Raniganj Twitter Review: अशी शौर्यगाथा होणे नाही! अक्षय कुमारच्या सिनेमाने जिंकली मनं

नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित गडकरी या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे.

‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल? या प्रमुख भूमिकेत कोण पाहायला मिळेल यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा खुलासा होणार आहे. जो कलाकार गडकरींची भूमिका साकारणार त्याला आव्हानात्मक काम असेल यात शंका नाही.

gadkari marathi movie based on life of union minister nitin gadkari
Mission Raniganj Twitter Review: अशी शौर्यगाथा होणे नाही! अक्षय कुमारच्या सिनेमाने जिंकली मनं

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, ‘’ नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.’’

२७ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com