विंटर इज हियर, ‘गेम ऑफ थ्रोन्स’ शेवटचा सिझन रिलिज...

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

अखेर ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा आठवा सिझन आज प्रदर्शित झाला. याची सोशल मिडियावर तर चर्चा होतीच पण, या सिरिजच्या चाहत्यांना कधी एकदा हा दिवस येतो असे झाले होते. असे असले तरी अनेकांना नक्की ही सिरिज काय आहे हे माहित हे माहित नाही. 

अखेर ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा आठवा सिझन आज प्रदर्शित झाला. याची सोशल मिडियावर तर चर्चा होतीच पण, या सिरिजच्या चाहत्यांना कधी एकदा हा दिवस येतो असे झाले होते. असे असले तरी अनेकांना नक्की ही सिरिज काय आहे हे माहित हे माहित नाही. 

‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी सुरू झालेला सत्तेचा खेळ. जॉर्ज आर. आर. मार्टनि यांच्या ‘साँग ऑफ आइस अ‍ॅण्ड फायर’ या कादंबरीवरून या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. 2011मध्ये या सिरिडची सुरुवात झाली. मार्टनि यांनी या कादंबरीचे लिखाण सात भागांत केले आहे. यांतील प्रत्येक भागावर अनुक्रमे एक सिझन आहे. परंतु, मार्टीन यांचे पुढचे पुस्तक येण्याआधीच सिरिजचा आठवा सिझन येत असल्याने याबद्दल विशेष उत्सुकता आहे.  

‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही ‘वेस्टोरॉस’ या साम्राज्याची कथा आहे. यामध्ये सात राज्यांचा समावेश आहे. यामध्ये उत्तरेकडे स्टार्क ऑफ विंटरफेल (रुल्स ऑफ नॉर्थ), ट्ली ऑफ रिव्हरन (रुल्स ऑफ रिव्हरलँड), अ‍ॅरेन ऑफ द एरी (रुल्स ऑफ व्हेल) आणि दक्षिणेकडे लॅनिस्टर ऑफ कॅस्टर्ली रॉक (रुल्स ऑफ द वेस्टरलँड), ब्रॅथॉन ऑफ स्टॉम्र्स एंड (रुल्स ऑफ द स्टॉर्मलँड), ट्रेल ऑफ हायगार्डन (रुल्स ऑफ द रिच), मार्टेल ऑफ सन्सस्पेअर (रुल्स ऑफ ड्रोन) या सात राज्यांचे मिळून वेस्टोरॉस आहे. किंग्स लँडिंग ही या साम्राज्याची राजधानी आहे. राज्यांवर राज्य करणारा राजा ज्या सिंहासनावर बसतो त्याला ‘आयर्न थ्रोन’ म्हणतात.

हा आर्यन थ्रोन मिळविण्यासाठी लागलेली चुरस म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’. यामध्ये विविध संकटांना संकटांना थोपवण्यासाठी उत्तरेला एक मोठी भिंत उभारण्यात आली आहे. त्याला ‘द वॉल’ असे म्हणतात. या भिंतीच्या पलीकडे राजाच्या शासनाखाली राहणे पसंत न करणारे लोक राहतात त्यांना ‘वाइल्ड लिंग्स’ म्हणतात. या लोकांना राज्यात येण्यापासून रोखण्यासाठी सनिकांची विशाल फौज तनात करण्यात आली आहे. त्यांना ‘नाइट्स वॉच’ म्हणतात. याशिवाय या भिंतीच्या मागे 'आर्मि ऑफ डेड' देखील अस्तित्वात आहे. ज्यांच्याशी असलेली लढत ही आठव्या सिझनचा महत्त्वाचा भाग असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: game of throne last season has released

टॅग्स