'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'बॉन्ड' फेम अभिनेत्री डेम डायना रिग यांचं निधन, भारतात घालवलं होतं लहानपण

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 11 September 2020

'गेम ऑफ थ्रोन्स'मधील प्रसिद्ध अभिनेत्री डेम डायना रिग यांचं निधन झालं आहे. त्या ८२ वर्षांच्या होत्या.

मुंबई-  'गेम ऑफ थ्रोन्स'मधील प्रसिद्ध अभिनेत्री डेम डायना रिग यांचं निधन झालं आहे. त्या ८२ वर्षांच्या होत्या. बीबीसीच्या रिपोर्टनुसार त्यांना कॅन्सर होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांना त्यांच्या या आजाराविषयी कळालं होतं. त्या त्यांच्या शेवटच्या काळात कुटुंबासोबत होत्या. मात्र त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात एकांत हवा होता.   

हे ही वाचा: रणबीर-आलियाने सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर सुरु केलं 'या' सिनेमासाठी काम 

डायना यांची मुलगी Rachael Stirling ने याविषयी अधिक माहिती देताना म्हटलं की, 'माझी प्रेमळ आई आज सकाळी घरात कुटुंबियांच्या उपस्थितीत आम्हाला सोडून गेली. तिने हसत खेळत तिचं असामान्य जीवन घालवलं. हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत की मी त्यांना किती मिस करेल.'

डायना यांच्या निधनावर जेम्स बॉन्ड स्टार George Lazenby यांनी ट्विट केलं. त्यांनी लिहिलंय, 'डायना रिग यांच्या निधनाविषयी ऐकून खूप दुःख झालं. महान थिएटर आणि स्क्रीन अभिनेत्री.' डायना यांनी On Her Majesty's Secret Service मध्ये जेम्स बॉन्ड यांच्या पत्नीची भूमिका साकरली होती. याव्यतिरिक्त डायना रिगने टीव्ही सिरीज 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये Olenna Tyrell च्या भूमिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. 

डायना रिग यांचा जन्म युकेमध्ये झाला होता. त्यांचे वडिल बिकानेरचे महाराज असण्यासोबतंच रेल्वे इंजीनिअर म्हणून देखील काम करत होते.  डायना ८ वर्षांच्या असे पर्यंत भारतात राहिल्या आणि मग इंग्लंडला परत गेल्या होत्या. हिंदी त्यांची दुसरी भाषा होती.   

game of thrones and actor dame diana rigg dies at 82  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: game of thrones and actor dame diana rigg dies at 82