गेम ऑफ थ्रोन्समधला जॉन स्नो बाप झाला 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 17 February 2021

किट आणि रोजनं यापूर्वी सप्टेंबर मध्ये एक पोस्ट सोशल मीडियावर केली होती.

मुंबई -  गेम  ऑफ थ्रोन्स मालिकेनं त्यावेळी एक वेगळा माहौल तयार केला होता. अनेकांच्या आवडीची ही मालिका होती. त्याच्या येणा-या प्रत्येक सीझनची प्रेक्षक वाट पाहत असत. जगभरातील मोठा प्रेक्षकवर्ग या मालिकेनं आपलासा केला होता. 8 सीझन झालेल्या या मालिकेनं वेगवेगळे पुरस्कार आपल्या नावावर केले होते. त्या मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखा होती जॉन स्नो ची. ती साकारली होती किट हॅरिंग्टननं. तो आता एका मुलाचा पिता झाला आहे. सोशल मीडियावर त्यानं पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

जॉननं ही माहिती सांगितल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. गेम ऑफ थ्रोन्समध्ये कमालीची लोकप्रियता किटच्या वाट्याला आली. त्यानं त्याच मालिकेतील आपली सहकलाकार रोज लेस्लीशी विवाह केला आहे. रोजनं गेम ऑफ थ्रोन्समध्ये यग्रिटची व्यक्तिरेखा साकारली होती. या जोडप्याला जगभरातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या लग्नाच्यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना प्रसिध्दी मिळाली होती. त्या मालिकेतल्या भूमिकेमुळे अमाप लोकप्रियता दोघांना मिळाली होती.

 किट आणि रोजनं यापूर्वी सप्टेंबर मध्ये एक पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्यात त्यांनी सांगितले होते की आमच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. मंगळवारी लंडनमधील एका रस्त्यावर फिरताना ते दोघे दिसून आले. तेव्हा त्यांना कॅमे-यात कैद करण्यात आले होते. जेव्हा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा फॅन्सनं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 2018 मध्ये त्या दोघांचे लग्न झाले होते. गेल्या 10 वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते.

पंजाबमधील रस्त्याला सोनूच्या आईचे नाव; रात्री दीड वाजता सांगितली आठवण

किटनं एका मुलाखतीत असे सांगितले होते की, जेव्हा गेम ऑफ थ्रोन्स ही मालिका संपली तेव्हा मला प्रचंड थकवा आला होता. कारण सतत त्या मालिकेचे चित्रिकरण सुरु होते. अजिबात विश्रांती नव्हती. मला त्यावेळी दारुचेही व्यसन लागले होते. ते एवढे वाढले की पुढे मला ते सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात जावे लागले. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: game of thrones Jon snow aka kit Harington and rose Leslie blessed with baby boy