पंजाबमधील रस्त्याला सोनूच्या आईचे नाव; रात्री दीड वाजता सांगितली आठवण 

Bollywood actor sonu sood reveal the road in the moga named of his mother professor Saroj sood road
Bollywood actor sonu sood reveal the road in the moga named of his mother professor Saroj sood road

मुंबई - प्रख्यात अभिनेता हा सोनू सुद हा त्याच्या अभिनयासाठी जेवढा प्रसिध्द आहे त्याच्यापेक्षा अधिक तो मदतशील व्यक्ति म्हणून जास्त परिचित आहे. त्यानं आतापर्यत हजारो जणांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे त्याला फॉलो करणा-यांची संख्या अधिक आहे. देशातल्या विविध राज्य़ांमध्ये त्याने वेगवेगळ्या लोकांना मदत करुन आपल्यातील सहद्यशीलतेचा परिचय करुन दिला आहे. सोनू आता सोशल मीडियावर एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे सोनूच्या आईचे नाव पंजाबातील एका रस्त्याला देण्यात आले आहे.

  गेल्या काही वर्षांपासून सोनूनं अभिनयाबरोबरच थोडा वेगळा ट्रॅक निवडला आहे. तो म्हणजे लोकांना मदत करण्याचा. सोनू सढळ हातानं गरजू लोकांना मदत करत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे, त्यांच्या अभ्यासासाठी गावात लाईटची सोय करणे, गरीबांना घरे बांधून देणे, अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं सोनून आनंदानं केली आहेत.गरीबांचा वाली असेही त्याला अनेकांनी म्हटले आहे. संकटकाळी त्यांच्या मदतीला धावून जाणे हे सोनूच्या स्वभावाचे प्रमुख वैशिष्ट्य सांगता येईल.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूकडे अनेक मदतीचे प्रस्ताव येत असतात. त्यातील महत्वाच्या प्रस्तावावर विचार करुन योग्य ती मदत सोनू संबंधिताला करत असतो. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा आहे. लोकं त्याला मानतात. त्याचा सत्कारही करतात. त्याचं झालं असं की, सोनूनं आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच पंजाबमध्ये व्यतीत केलेल्या काही आठवणींना सोशल मीडियावर शेअर केले आहे. यापैकी एक महत्वाची गोष्ट त्यानं यावेळी सांगितली आहे ती म्हणजे पंजाबमधील एका रस्त्याला सोनूच्या आईचे नाव दिले आहे. सोनूनं सांगितले की, माझी आई प्राध्यापक सरोज सूद हिचे नाव त्या रस्त्याला दिले आहे.

सोनूनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रात्रीच्या दीड वाजता सोनू त्या रस्त्यावर उभा आहे. त्या रस्त्याला सोनू यांच्या आईचे नाव देण्यात आले आहे. त्यावेळी त्यानं आपल्या आई - वडिलांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. सोनू म्हणाला, ही जागा माझ्या आयुष्यातील सर्वात स्पेशल जागा आहे. या रस्त्याला माझ्या आईचे नाव आहे. प्रोफेसर सरोज सूद असे नाव त्या रस्त्याला देण्यात आले आहे. माझे घर त्या पलीकडच्या बाजूला आहे जिथून मी नेहमी शाळेला जात होतो. 


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com