esakal | 'गांधी' चित्रपटातील 'त्या' दृश्यासाठी सेटवर होता ४ लाख लोकांचा जमाव
sakal

बोलून बातमी शोधा

gandhi

'गांधी' चित्रपटातील 'त्या' दृश्यासाठी सेटवर होता ४ लाख लोकांचा जमाव |Gandhi

sakal_logo
By
टीम ई सकाळ

२ ऑक्टोबर.. महात्मा गांधी यांची जयंती. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये महात्मा गांधींच्या आयुष्यावर आधारित विविध कथा बघायला मिळतात. महात्मा गांधींच्या जीवनावर आजवर अनेक चित्रपट आले, त्यातील सर्वांत महत्त्वाचा चित्रपट म्हणजे १९८२ ला प्रदर्शित झालेला गांधी. 'गांधी' (Gandhi) या चित्रपटात अभिनेते बेन किंग्सले (Ben Kingsley) यांनी मोहनदास करमचंद गांधी यांची साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या सर्वाधिक लक्षात राहिली. बेन किंग्सले हे ब्रिटिश अभिनेते आहेत. १९८२ मध्ये आलेल्या 'गांधी' हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय झाला होता. बापूंवर आधारित या चित्रपटाने बेन किंग्सले यांना बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. २०१९ मध्ये बेन यांनी या चित्रपटासंबंधी अनेक आठवणी सांगितल्या होत्या.

एका मुलाखतीत, बेन किंग्सले म्हणाले होते, "मला वाटतं गांधींच्या भूमिकेमुळे मला लोकांचं खूप प्रेम मिळालं आणि त्यामुळे माझी इंडस्ट्रीत मागणीदेखील वाढली होती. हे सगळं खूपचं अद्भुत होतं, भारतातील लोक खूप उदार मनाचे आहेत." त्यांनी 'गांधी' या चित्रपटातील बापूंच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराच्या सीनचा प्रसंग सांगितला होता. या सीनच्या शूटिंगसाठी तब्बल ४ लाख लोकांचा जमाव झाला होता, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: गांधी जयंती : ८ पुरस्कार जिंकणारा 'गांधी' चित्रपट, पाहा फोटो

पडद्यावर गांधीजी साकारणं अतिशय कठिण होतं, असं बेन म्हणाले होते. रिचर्ड एटनबरो यांनी बेन यांना महात्मा गांधी यांचे काही फुटेज पाहण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी एका वेळेत पाच तासांची रियल न्यूज फुटेज पाहिली होती. ते फुटेज पाहिल्यानंतर बेन यांनी ते फुटेज पुन्हा कधीच बघायचं नाही, असं ठरविलं होतं. कारण गांधीजींची भूमिका साकारणं त्यांना खूप अशक्य वाटत होतं. मात्र रिचर्ड यांनी अशक्य ते शक्य करून दाखवल्याचं ते म्हणतात. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, ओम पुरी, सय्यद जाफरी, अमरीश पुरी, नीना गुप्ता यांच्यासमवेत अनेक देश-विदेशातील कलाकार होते.

loading image
go to top