Gandhi Godse Ek Yudh: दिग्दर्शक राजकुमार संतोषीला जीवे मारण्याच्या धमक्या, मुंबई पोलिसांकडून संरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gandhi godse, gandhi godse ek yudh,  rajkumar santoshi

Gandhi Godse Ek Yudh: दिग्दर्शक राजकुमार संतोषीला जीवे मारण्याच्या धमक्या, मुंबई पोलिसांकडून संरक्षणाची मागणी

'गांधी गोडसे: एक युद्ध' हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका चित्रपटगृहात चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गोंधळ झाला होता. आता तर चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आली आहे. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करून सुरक्षेची मागणी केली.

हेही वाचा: Gandhi Godse Ek Yudh: नथुरामला खलनायक दाखवल्यास.. हिंदू महासभेचा इशारा..

खरं तर, राजकुमार संतोषी यांच्या 'गांधी गोडसे: एक युद्ध' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, त्यानंतर वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे. या चित्रपटाला विरोध का होतोय कारण की ,चित्रपटात महात्मा गांधींचा अवमान करण्यात आला आहे, तर त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांचा गौरव करण्यात आला आहे, असे विरोध करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे.

मध्य प्रदेशानंतर मुंबईतही या चित्रपटाला प्रचंड विरोध झाला. मुंबईतील एका चित्रपटगृहात 'गांधी गोडसे एक युद्ध' या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान मोठा गोंधळ झाला. येथे स्क्रिनिंगशी संबंधित पत्रकार परिषदेदरम्यान मीडियात बसलेले काही अज्ञात लोक उठले आणि त्यांनी चित्रपटाला विरोध करण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत ‘गांधी जिंदाबाद’च्या जोरदार घोषणा दिल्या.

याशिवाय दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या घटनेनंतर त्यांनी मुंबई पोलिसांकडे अतिरिक्त सुरक्षेची विनंती केली. त्यांनी पत्रात लिहिले की, 'मला काही अज्ञात लोकांकडून या चित्रपटाचे प्रदर्शन आणि प्रमोशन रोखण्यासाठी अनेक धमक्या आल्या. मला असुरक्षित वाटते. अशा लोकांना सोडले तर माझे व माझ्या कुटुंबीयांचे मोठे नुकसान व इजा होऊ शकते.' गांधी गोडसे एक युद्ध सिनेमा २६ जानेवारीला रिलीज होतोय