'थोडे नव्हे तर 98 किलो वजन केलं कमी '

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 16 December 2020

बॉलिवूडमध्ये आपल्या नृत्यदिग्दर्शनानं वेगळं स्थान निर्माण करणा-या गणेशचं वजन हे काही वर्षांपूर्वी 150 किलोच्या पुढे होतं.

मुंबई - हल्ली वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन, फिटनेस ट्रेनरकडे जाऊन, आहारतज्ञाकडूनही मार्गदर्शन घेतात. यामुळे वजन कमी झालं तर ठीक अन्यथा सर्जरीचा पर्यायही ते स्वीकारत असल्याचे दिसून आले आहे. बॉलिवूडमधील प्रसिध्द कोरिओग्राफर गणेश आचार्य याची शरीरयष्टी सगळ्यांनाच माहिती असेल. मात्र त्यानं कमी केलेल्या वजनाची चर्चा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या नृत्यदिग्दर्शनानं वेगळं स्थान निर्माण करणा-या गणेशचं वजन हे काही वर्षांपूर्वी 150 किलोच्या पुढे होतं. ते कमी करण्यासाठी आहारात बदल केला. व्यायामावर भर दिला. अशाप्रकारे वजन कमी करण्यावर त्यानं भर दिला. नुकताच तो कपिल शर्माच्या शो मध्ये आला असताना त्याचा नवीन लुक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी गणेश आचार्य पहिला कसा दिसत होता आणि आता कसा दिसत आहे असा भाव त्यांच्या चेह-यावर असल्याचे दिसून आले. यावेळी गणेशनं आपण कमी केलेल्या वजनाविषयी सांगितले.

कपिल शर्मा शो च्या एका प्रोमोसाठी गणेश आला होता. त्यावेळी त्यानं आपण आतापर्यत 98 किलो वजन कमी केल्याचे सांगितले. यावर कपिलनं खुमासदार शैलीत त्याला काही प्रश्नही विचारले. तो म्हणाला, दोनं माणसं तुमच्यातून गायब झाली आहे. 2017 मध्ये ज्यावेळी गणेश त्या कार्यक्रमात आला होता तेव्हा त्याचे वजन जवळपास 200 च्या पुढे असल्याचे त्यानं सांगितले. 200 किलो वजनाचा आकडा त्यानं 2015 मध्ये गाठला होता. त्यानंतर एका चित्रपटासाठी त्यानं वजन कमी केलं होतं. त्याच्या नव्या लुकवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. त्याचं कौतूकही केलं आहे.  

‘ जो बचेगा वो ही गद्दी पे बैठेगा ‘; रसिका दुग्गलनं सांगितलं मिर्झापूरचं ‘पॉलिटिक्स’

वजन कमी करण्याविषयी गणेश यांनी सांगितले की, मला वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. ते एक अवघड चॅलेंज होते. मात्र काही करुन मला वजन कमी करायचे होते. त्यासाठी दीड वर्षांपासून मी मेहनत घेत आलो आहे. त्यावेळेपासून वजन कमी करतो आहे. आता ते वाढू न देणं यासाठी खानपानातील बदल काटेकोरपणे पाळतो आहे. 
  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Acharya reveals that he lost 98 kg weight