esakal | सोनाली बेंद्रेने असे मानले बाप्पाचे आभार!
sakal

बोलून बातमी शोधा

sonali bendre celebrating eco-friendly ganpati

सोशल मीडियावर बॉलिवू़ड ते मराठमोळ्या तारकांपर्यंत सगळ्यांनीच जल्लोषात गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे आणि त्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.मात्र या सर्व पोस्टमध्ये काही मोजक्या पोस्ट खास आहेत आणि चाहत्यांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. अशीच एक पोस्ट शेअर केली आहे अभिनेत्री सोनीली बेंद्रेनं.

सोनाली बेंद्रेने असे मानले बाप्पाचे आभार!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. घराघरात बाप्पाची स्थापना झाली आहेच आणि जोडीला वर्षाव होतोय तो सेलेब्रिटिंच्या बाप्पांच्या फोटोंचा! सोशल मीडियावर बॉलिवू़ड ते मराठमोळ्या तारकांपर्यंत सगळ्यांनीच जल्लोषात गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे आणि त्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.मात्र या सर्व पोस्टमध्ये काही मोजक्या पोस्ट खास आहेत आणि चाहत्यांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. अशीच एक पोस्ट शेअर केली आहे अभिनेत्री सोनीली बेंद्रेनं.

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला 2018 मध्ये कॅन्सरचं निदान झालं. त्यावेळी तिने मोठ्या धैर्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत याची माहिती दिली होती. परदेशी उपचार घेताना तिने खंबीरपणे या संकंटाला तोंड दिलं. आता ती बरी झाली असून सर्व स्थरावर लोकांना जागृक करण्याचं आणि प्रेरणा देण्याचं काम करते आहे. मागिल वर्षी आजाराशी दोन हात करतवेळी घरापासून दूर असातानाच्या गणपती उत्सवाची आठवण यावेळी शेअर केली. यावर्षी म्हणजेच 2019 च्या गणपती आगमनाच्या निमित्ताने तिने इंस्टाग्रामवर गणपती बाप्पासोबतची एक पोस्ट टाकली आहे. 

बाप्पासोबतच्या या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. "गणपती हा माझा आवडता सण आहे आणि मगिल हा सण घरी साजरा करणं खूप मिस केलं... पण, फेस टाईम (face time) च्या माध्यमातून मी आरतीमध्ये सामील झाले. यावर्षी निरोगी आणि खंबीरपणे परतताना कुटुंबासोबत हा सण साजरा करत असताना मला अत्यंत आनंद होत आहे. श्रद्धा असेल तर तुम्ही आणि तुमच्या देवामध्ये नक्की संवाद होऊ शकतो असं मला वाटतं. म्हणून त्या श्रद्धेला कमी होऊ देऊ नका." असं म्हणत तीने बाप्पाचे आभार मानले आहेत. यावर्षीदेखील इकोफ्रेंडली गणपतीची स्थापना केल्याचंही तीने नमूद केलं आणि वाचकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या. 

loading image
go to top