Disha Patani : अंबानींच्या गणरायाचे दर्शन घ्यायला गेली, पण 'दिशा' भरकटली! साडीमुळे झाली ट्रोल

दिशाविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. ती आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
Disha Patani is getting trolled for her outfit
Disha Patani is getting trolled for her outfitesakal

Disha Patani is getting trolled for her outfit : दिशाविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. तिची स्टाईल, तिचा पेहराव यामुळे दिशा कित्येकदा नेटकऱ्यांच्या टीकेचा विषय झाली आहे. अशातच ती आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याचे कारण तिनं अंबानींच्या गणरायाच्या दर्शनाला केलेली वेशभूषा. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

भारतातले प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटीलिया या निवासस्थानी बॉलीवूड सेलिब्रेटींनी गर्दी केली होती. त्याचे कारण अंबानी यांनी त्यांच्या गणरायाच्या दर्शनासाठी दिलेले निमंत्रण. याला ज्येष्ठ अभिनेत्री रेखा पासून रणवीर सिंग पर्यत बऱ्याच संख्यांनी सेलिब्रेटी हजर होते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Also Read : Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर पडणारा लिबिया आता पूराच्या

यात अभिनेत्री दिशा पटानी ही चर्चेत आली आहे. तिनं परिधान केलेली साडी यामुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. दिशा आपण कोणत्या कार्यक्रमाला निघालो आहोत, त्याचे औचित्य काय याचे भान ठेवणं गरजेचे आहे. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहे. नेटकऱ्यांनी दिशाला चांगलेच खडसावले आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं बॉलीवूड सेलिब्रेटींचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Disha Patani is getting trolled for her outfit
Jawan BO : गणपती बाप्पा शाहरुखला पावला! गणेश चतुर्थीच्या दिवशी पार केला इतक्या कोटींचा टप्पा

अंबानी परिवाराच्या वतीनं देण्यात आलेल्या निमंत्रणाचा स्विकार कित्येक सेलिब्रेटींनी अँटिलियावर गर्दी केली होती. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरपासून क्रीडा क्षेत्रातीलही सेलिब्रेटी उपस्थित होते. यात दिशानं मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिनं ज्याप्रकारची वेशभूषा केली होती. दिशा ही तिची मैत्रीण मौनी रॉयसोबत त्या कार्यक्रमाला गेली होती. त्यावेळी तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.

Disha Patani is getting trolled for her outfit
Nana Patekar : 'आजकालचे अभिनेते हे...' नाना पाटेकर पुन्हा बोलले! जुन्या काळातील दिग्गजांच्या आठवणींना दिला उजाळा

युझर्स आणि चाहत्यांना दिशाचा तो अंदाज काही केल्या पसंत आला नाही.त्यामुळे त्यांनी तिच्यावर आगपाखड केली आहे. दिशा तू जी काही फॅशन केली आहेस ती या औचित्याला साजेशी अशी नाही. आपण काय करतो आहोत याचे भान ठेवण्याची गरज आहे. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे.

हा कोणताही फॅशन इव्हेंट नाही दिशा, तुला कसे कपडे असावेत याचे भान हवे. तुला कुणी सांगत नाही की, डोक्यावर पदर घेऊन ये पण किमान आपण धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत आहोत ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी दिशा. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी दिशाला सुनावले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com