Jawan BO : गणपती बाप्पा शाहरुखला पावला! गणेश चतुर्थीच्या दिवशी पार केला इतक्या कोटींचा टप्पा

Jawan Box Office Collection Day 13: 'जवान'ने रिलीजच्या 13व्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला आणि आता या चित्रपटाचं एकूण कलेक्शन किती कोटी झाले आहे यावर नजर टाकूया.
jawan box office collection
jawan box office collection SAKAL

Jawan Box Office Collection Day 13: गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर फक्त शाहरुख खानच्या जवानचा बोलबाला आहे. या चित्रपटाने रिलिज होताच अनेक रेकॉर्ड मोडत शाहरुख खानला पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशाह बनवलं आहे.

शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. 7 सप्टेंबर रोजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एंट्री केली आणि रिलिजच्या पहिल्याच दिवशी भारतात सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला.

जवान प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले तरी चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी होत आहे. त्यामुळेच 'जवान' चित्रपटाच्या कमाईत दररोज वाढ होत आहे.

jawan box office collection
Imlie Serial: प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने लाईटमनचा मृत्यू

रिलिजच्या दुसऱ्या मंगळवारी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या चित्रपटाने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. 'जवान'ने रिलीजच्या 13व्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला आणि आता या चित्रपटाचं एकूण कलेक्शन किती कोटी झाले आहे यावर नजर टाकूया.

jawan box office collection
Ganesh Chaturthi 2023: जात धर्माच्या पलीकडे सलमान शाहरुखचं सेलिब्रेशन! थाटामाटात केलं गणरायाचं स्वागत..

सॅकनिल्कच्या माहितीनुसार जवाननं पहिल्याच दिवशी 75 कोटींची कमाई केली होती रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 50 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 70 कोटींची कमाई कर जवानाने सुरुवातीच्या वीकेंडमध्ये 286 कोटींचा व्यवसाय केला.


(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

jawan box office collection
Prakash Raj: "नेमकं रिकामं काय? हातातला फोल्डर की त्यांचं डोकं?" प्रकाश राज यांनी पुन्हा नरेंद्र मोदींना डिवचलं

तर आता दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली असली तर चित्रपटाने चांगले कलेक्शन केले. जवानने दुसऱ्या शनिवारी 32 कोटी आणि रविवारी 37 कोटींची कमाई केली तर सोमवारी या चित्रपटाचे कलेक्शन 16 कोटी आणि मंगळवारी या चित्रपटाने 500 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली.

sacnilk च्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने मंगळवारी 14 कोटींचा व्यवसाय केला. आता जवानच्या 13 दिवसांच्या कमाईवर नजर टाकली असता जवानने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 507.88 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आता जवान गदर 2, पठाण आणि बाहुबली 2 यांचा रेकॉर्ड यांचाही रेकॉर्ड मोडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

अॅटली दिग्दर्शित जवानमध्ये प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपति, नयनतारा, दीपिका पदुकोण, संजय दत्त, गिरिजा ओक, सान्या मल्होत्रा यांच्या भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com