Ganesh Festival 2023 : 'चप्पल घालून कोण पूजा करतं का फराह'? कोरिओग्राफरनं दिले सणसणीत उत्तर

त्या फोटोमध्ये फराह, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि पत्रलेखाही फराहसोबत होत्या. काहींनी त्या फोटोवरुन फराहला ट्रोल केल्याचे दिसून आले आहे.
Ganesh Chaturthi 2023 :
Ganesh Chaturthi 2023 :esakal

Ganesh Chaturthi 2023 : बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी चर्चेत असते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ फराहनं तिच्या कोरिओग्राफीनं आणि चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.काही वेळा तिला तिच्या परखड स्वभावामुळे ट्रोल देखील व्हावे लागले आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

त्याचे झाले असे की, फराहनं तिच्या इंस्टावरुन एक फोटो शेयर केला होता. त्या फोटोमध्ये फराह, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि पत्रलेखाही फराहसोबत होत्या. काहींनी त्या फोटोवरुन फराहला ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. फराहनं देखील ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे. ब्ल्यु अँड व्हाईट सूट सोबत स्लीपर्स असा तो फोटो आहे.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर पडणारा लिबिया आता पूराच्या

गणेश चतुर्थीच्या निमित्तानं फराहनं स्लिपर्स घालून पूजा केल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यावर सेलिब्रेटीनं तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. सध्या देशभरामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे बॉलीवूड सेलिब्रेटींनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली आहे. त्यात सलमान खान पासून बच्चन अनेक सेलिब्रेटींचा समावेश आहे.

Ganesh Chaturthi 2023 :
Ganesh Chaturthi 2023 : देवा तूंचि गणेशु। सकलमति प्रकाशु।

त्यानंतर फराहनं एक पोस्ट शेयर करुन गणेश चतुर्थीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावरुन ती ट्रोल झाली आहे. त्यात तिनं नेटकऱ्यांना चांगलेच प्रत्युत्तरही दिले आहे. फराहनं ती पोस्ट शेयर करताना लिहिलं आहे की, खान, कुरेशी आणि राव यांच्याकडून तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. राजकुमार राव तुम्ही इतके व्यस्त होतात की, आम्हाला या अशाप्रकारे शुभेच्छा द्यावा लागत आहेत. फराहनं ही पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिचा तो चप्पलमधील फोटो पाहिला आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Ganesh Chaturthi 2023 :
Ganesh Chaturthi 2023: अंबानींच्या घरी गणरायाचा जल्लोष! बॉलिवूडकरांची मांदियाळी.. व्हिडिओ व्हायरल

एका युझर्सनं लिहिलं आहे की, मॅडम प्लीज तुम्ही चप्पल काढून पूजा करु शकत नाही का, दुसऱ्यानं लिहिलं आहे की, चप्पल घालून कुणी पूजा करतं का...यासारख्या अनेक प्रतिक्रिया ऐकून चिडलेल्या फराहानं देखील नेटकऱ्यांना फटकारले आहे. तुम्हाला सांगते तुम्ही जो फोटो पाहता आहात, त्यावेळी आम्ही घराच्या बाहेर होतो. त्यामुळे तुम्ही त्यावरुन मला बोलणे हे चूकीचे आहे. काही नेटकऱ्यांनी यावेळी फरहाची बाजू घेत तिला समर्थन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com