'गंगुबाई काठियावाडी'ला कुटुंबियांचाच विरोध; बदनामी केल्याचा आरोप

gangubai kathiawadi
gangubai kathiawadisakal media

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील कामाठीपुरा परिसरातील वादग्रस्त व्यक्तिमत्व गंगुबाई काठियावाडी यांच्या आयुष्यावर आधारित गंगुबाई काठीयावाडी (Gangubai Kathiawadi movie) हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच बारगळण्याची शक्यता झाली आहे. या चित्रपटात गंगुबाई काठीयावाडी यांचे चित्रण वास्तवाला सोडून रंगवल्याचे सांगत या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची बदनामी (family defamation script) केल्याचा आरोप गंगुबाई काठीयावाडी यांच्या कुटुंबियांनी (Gangubai Kathiawadi family allegations) केला आहे. या चित्रपटावर बंदी (film banned demand) घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

gangubai kathiawadi
कलिना संकुलात चित्रीकरण कशाला ? विद्यार्थी संघटनेचा सवाल

लेखक एस. हुसेन झैदी यांच्या "माफिया क्वीन इन मुंबई" या पुस्तकावर आधारित संजय लीला भंसाली यांचा 'गंगुबाई काठियावाडी' नावाचा चित्रपट येऊ घातला आहे . आलिया भट या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे.त्यात दाखवलेल्या अनेक गोष्टींवर गंगुबाई काठीयावाडी यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. गंगुबाई यांना त्यांच्या प्रियकराने फसून आणून कधीही विकले नसल्याचे गंगुबाई यांची मुलगी बबीता गौडा यांनी सांगितले. गंगुबाई यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची फार आवड होती, त्यामुळे त्या स्वतःहून गुजरात येथील आपल्या घरातून पळून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्या कामाठीपुरा परिसरात वास्तव्यास होत्या. मात्र त्यांनी स्वतःहून वेश्याव्यवसाय कधीही केला नसल्याचेही बबीता यांचे म्हणणे आहे.

कामाठीपुरा परिसरामध्ये गंगुबाई वास्तव्यास होत्या , त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणामध्ये वेश्याव्यवसाय चालायचा. येथील महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, अनेक महिलांवर अत्याचार देखील होत होते. त्याविरोधात गंगुबाई यांनी संघर्ष सुरू करून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांचा नातू विकास गौडा यांनी सांगितले. या महिलांना न्याय देण्यासाठी त्यांनी त्यावेळचा माफिया डॉन करीम लाला यांची भेट घेऊन मदत मागितली होती. गंगुबाई यांनी करीम लाला यांना राखी बांधल्याने ते गंगुबाई यांना आपली बहीण मानत असत. यामुळे गंगुबाई यांच्यासह इतर महिलां वरील अत्याचार थांबले व त्यांना न्याय मिळाला असेही विकास म्हणाले.गंगुबाई ह्यांनी कधीही कुणाला माहरण,शिवीगाळ केली नाही.त्या अतिशय प्रेमळ होत्या म्हणूनच येथील लोकांमध्ये त्या गंगू माँ म्हणून प्रसिद्ध झाल्याचे ही विकास यांचे म्हणणे आहे.

gangubai kathiawadi
मुंबई : खेळाचे मैदान उरणार की नाही ? खेळाडू चिंताग्रस्त

विकास गौडा यांनी एस. हुसेन झैदी यांनी आपल्या पुस्तकात गंगुबाई यांच्या रंगवलेल्या चुकीच्या व्यक्तिमत्वावर देखील आक्षेप नोंदवला आहे. आम्ही सांगितलेल्या गोष्टी त्या पुस्तकामध्ये न लिहिता अनेक काल्पनिक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे असा आरोप विकास यांनी केला. गंगुबाई काठीयावाडी यांचा उल्लेख त्या पुस्तकात गंगुबाई कोठेवाली असा चुकीचा करण्यात आल्याचेही विकास यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पुस्तकावर आधारित या चित्रपटामुळे गंगुबाई यांचे व्यक्तिमत्व बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असून त्यावर बंदी घालण्याची मागणीही विकास गवडा यांनी केली आहे.

या चित्रपटावर अखिल पद्मशाली समाज ट्रस्ट मुंबई या तेलगु समाजाच्या संघटना देखील आक्षेप नोंदवला आहे. तेलगू समाजातील कष्टकरी कामगारांमुळे कामाठीपुरा ओळखला जात असून त्यांची ओळख पुसून त्यांची बदनामी या चित्रपटाच्या माध्यमातून केली गेल्याचे येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीता नंदाल यांचे म्हणणे आहे. याशिवाय येथील अखिल कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखील आक्षेप नोंदवत या चित्रपटामुळे संपूर्ण कामाठीपुरा परिसरातील रहिवाशी आणि खास करून महिलांची बदनामी होणार असल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन आम्ही होऊ देणार नाही असे येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर परब यांनी सांगितले. या चित्रपटाला स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी देखील विरोध दर्शवला आहे. आपण या संदर्भात मार्च 2021 रोजी पार पडलेल्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून विरोधक केल्याचेही त्यांनी सांगितले.

या चित्रपटात गंगुबाई ह्या संपूर्ण कामाठीपुरा परिसराच्या अध्यक्षा असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे जो चुकीचा आहे. याशिवाय संपूर्ण कामाठीपुरा परिसरात फक्त 2 ते 3 गल्ल्यांमध्ये वेश्या व्यवसाय चालतो. मात्र चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण कामाठीपुरा परिसरात वेश्या व्यवसाय चालत असल्याचे अवास्तव चित्रण रंगवण्यात आल्याचेही पटेल यांनी सांगितले. यामुळे कामाठीपुरा आणि त्यातील रहिवाशांची बदनामी होत असल्याने या चित्रपटातून कामाठीपुरा नाव वगळा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याच बरोबर चित्रपटाच्या सुरुवातीला या चित्रपटाचा कामाठीपुराशी काहीही संबंध नाही अशा प्रकारची ध्वनिफीत चालवावी आणि या चित्रपटामुळे येथील काठीयावाड समाजाची बदनामी होत असल्याने तोही शब्द वगळावा अशीही त्यांनी मागणी केली. याबाबत आपण राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांना पत्र लिहिले असून याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. सरकारने चालढकल केल्यास आपण न्यायालयामध्ये दाद मागू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com