Gangubai Kathiawadi ट्रेलरमध्ये आलियाचा जबरदस्त अंदाज; अजय देवगणचीही धमाकेदार एन्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gangubai Kathiawadi Movie

आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय.

Gangubai Kathiawadi ट्रेलरमध्ये आलियाचा जबरदस्त अंदाज

Gangubai Kathiawadi Movie : आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुप्रतिक्षित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. कोरोना महामारी (Coronavirus) आणि लॉकडाउनमुळं संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा चित्रपट वेळेवर पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सतत बदलली जात होती. परंतु, आता चाहत्यांची प्रतीक्षा संपलीय. गंगूबाई काठियावाडीच्या या 4 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त मसाला पाहायला मिळत आहे. या चित्रपटात आलिया भट्टनं मुंबईच्या रेड लाइट एरियातील (Mumbai Red Light Area) कामाठीपुरा येथील शक्तिशाली महिला गंगूबाईची भूमिका साकारलीय. आलियाच्या या चित्रपटात अजय देवगणही (Ajay Devgan) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

गंगूबाई काठियावाडी कोण होत्या?

गुजरातमधील (Gujarat) गंगूबाई काठियावाडी या वकील कुटुंबातील होत्या. अगदी लहान वयात एका मुलासोबत पळून जाऊन तिनं मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर गंगूची फसवणूक झाली, पण तिनं कधीच मागं वळून पाहिलं नाही. 1960 च्या दशकात गंगूबाई काठियावाडीनं लोकांमध्ये आपला ठसा उमटवला. कामाठीपुरात 'गंगुबाई कोठेवाली' या नावानं प्रसिद्ध होती. या ठिकाणी अनेक कोठे होते, त्यावर गंगूबाई देखरेख करत होत्या. गंगूबाईचा अंडरवर्ल्ड आणि राजकारणाच्या क्षेत्रातही चांगलाच दबदबा होता.

त्या काळात गंगूबाई काठियावाडी करीमलाला भेटत असतं. गुंड करीमलाला (Karim Lala) गंगूबाईच्या प्रेमात पडला होता. या चित्रपटात अजय देवगणनं करीमलालाची भूमिका साकारलीय. ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसतंय की, गंगूबाईची भूमिका साकारण्यासाठी आलियानं खूप मेहनत घेतलीय. आलिया भट्टचा हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये आल्यानंतर सुमारे 4 आठवड्यांनंतर OTT प्लॅटफॉर्म Netflix वर देखील प्रदर्शित केला जाईल. संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.