'गंगुबाईचा' मार्ग मोकळा, ठरलेल्या दिवशीच होणार प्रदर्शित: HC

बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग (Entertainment News) मोकळा झाला आहे.
Gangubai Kathiawadi Controversy News
Gangubai Kathiawadi Controversy NewsInstagram

Bollywood Movie: बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग (Entertainment News) मोकळा झाला आहे. या चित्रपटाच्या विरोधात (Alia Bhatt) काहींनी कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे त्याच्या प्रदर्शनाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र तो प्रश्न आता निकाली निघाला असून प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 25 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये पाहता येणार आहे. भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, अजय देवगण, विजय राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून गंगुबाईच्या कुटूंबियांनी या चित्रपटाबाबत आक्षेप नोंदवत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयानं गंगुबाई काठियावाडी चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला आहे. (Bombay High Court in its order said, "the film will release on February 25, without any hindrance.")

मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) गंगुबाईच्या विरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या दोन्ही याचिका कोर्टानं रद्द केल्या आहेत. या चित्रपटात गंगुबाई काठीयावाडी यांचे चित्रण वास्तवाला सोडून रंगवल्याचे सांगत या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची बदनामी (family defamation script) केल्याचा आरोप गंगुबाई काठीयावाडी यांच्या कुटुंबियांनी (Gangubai Kathiawadi family allegations) केला होता. चित्रपटावर बंदी (film banned demand) घालण्याची मागणीही त्यांनी केली होती. लेखक एस. हुसेन झैदी यांच्या "माफिया क्वीन इन मुंबई" या पुस्तकावर आधारित संजय लीला भंसाली यांचा 'गंगुबाई काठियावाडी' नावाचा चित्रपट येऊ घातला आहे . आलिया भट या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे.

त्यात दाखवलेल्या अनेक गोष्टींवर गंगुबाई काठीयावाडी यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. गंगुबाई यांना त्यांच्या प्रियकराने फसून आणून कधीही विकले नसल्याचे गंगुबाई यांची मुलगी बबीता गौडा यांनी सांगितले. गंगुबाई यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची फार आवड होती, त्यामुळे त्या स्वतःहून गुजरात येथील आपल्या घरातून पळून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्या कामाठीपुरा परिसरात वास्तव्यास होत्या. मात्र त्यांनी स्वतःहून वेश्याव्यवसाय कधीही केला नसल्याचेही बबीता यांचे म्हणणे आहे. कामाठीपुरा परिसरामध्ये गंगुबाई वास्तव्यास होत्या , त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणामध्ये वेश्याव्यवसाय चालायचा. येथील महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, अनेक महिलांवर अत्याचार देखील होत होते. त्याविरोधात गंगुबाई यांनी संघर्ष सुरू करून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांचा नातू विकास गौडा यांनी सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com