Gangubai Kathiawadi: 'आई होती समाजसेविका, चित्रपटानं वेश्या केली'

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
Actress Alia Bhatt
Actress Alia Bhatt

Bollywood News: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट(Alia Bhatt), अजय देवगण यांची प्रमुख भूमिका आहे. सध्या या चित्रपटावरुन वादाला सुरुवात झाली आहे. यापूर्वी देखील गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील गंगुबाई या व्यक्तिरेखावरुन वादाला सुरुवात झाली होती. आता गंगुबाई यांच्या मुलानं भन्साळी यांच्या चित्रपटावरुन नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या चित्रपटावर (Bollywood Movies) सडकून टीका केली आहे. येत्या काही दिवसांपूर्वी भन्साळींचा हा चित्रपट प्रदर्शित होणार असून तो त्यापूर्वीच वादात सापडल्याचे दिसून आले आहे.

प्रसिद्ध पत्रकार हुसैन झैदी यांच्या द माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित गंगुबाई काठियावाडी चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आलियानं त्यामध्ये गंगुबाई यांची भूमिका साकारली आहे. यासगळ्यात गंगुबाई यांच्या परिवारानं नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या आईला समाजसेविका म्हणून सादर न करता वेश्या म्हणून त्यांचे सादरीकरण करण्यात आले आहे. जे चूकीचे आहे. आपण त्याच्याशी सहमत नाही. त्यांनी समाजसेविका म्हणून काम केले. ती बाजू पुढे यायला हवी होती. सेक्स वर्कर यांच्यासाठी काम करणाऱ्या त्या महिलेला आपण कशाप्रकारे साकारले आहे याचाही विचार व्हायला हवा. असेही गंगुबाई यांच्या कुटूंबियांनी सांगितलं आहे.

Actress Alia Bhatt
Video Viral: पहाटेच्या अंधारात विकी-कतरिनाची लपाछपी

याबाबत एका वेब पोर्टलनं माहिती दिली आहे. गंगुबाई यांनी दत्तक घेतलेल्या बाबु रावजी शाह यांनी भन्साळींच्या चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी 2021 मध्ये या चित्रपटाच्या विरोधात हाय़कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. आज तकशी बोलताना बाबु रावजी यांनी सांगितले की, माझ्या आईला वेश्या म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यामुळे तिच्याविषयी लोकं बोलू लागले आहेत. हे चूकीचे आहे.

Actress Alia Bhatt
Video Viral: 'आई कुठे काय करते'च्या संजनाचं लग्न?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com