Garmi Marathi Review : दमदार विषय असूनही ‘गरमी’ गुन्हेगारीपटाच्या वळणाला

garmi review by tushar maghade Tigmanshu Dhulia TV Series Garmi marathi Review
garmi review by tushar maghade Tigmanshu Dhulia TV Series Garmi marathi Review

ओटीटीवर क्राईम, सस्पेन्स, बोल्ड दृश्याची भारमार असलेल्या सिरीज, चित्रपट बेसुमार आहे. बहुतांश अशा कंटेंटचा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे निर्माते, दिग्दर्शकांकडून अशा कंटेंट जास्त प्रमाणात प्रेक्षकांच्या ताटात वाढला जातो. उत्तर प्रदेश, बिहारची पार्श्‍वभूमी लाभलेले, शिव्यांचा मुक्त वापर, बोल्ड आणि रक्तरंजित दृश्याची रेलचेल असलेले सिरीज, चित्रपट आता ओटीटी प्रेक्षकांच्या आता अंगवळणी पडले आहेत.

यात ‘सोनी लिव’ वर रिलीज झालेली तिग्मांशू धुलियाची ‘गरमी’ वेब सिरीजने विश्‍वविद्यालयातील विद्यार्थी राजकारणाला हात घातला आहे. पण यूपीच्या क्राईम जॉनरच्या वेष्टणात गुंडाळल्यामुळे या विषयाला फाटे फुटून एक टिपिकल गुन्हेगारीपट प्रेक्षकांना बघावयास मिळतो.

विद्यार्थी राजकारणावर आधारित तसे फार कमी चित्रपट, सीरीज आहेत. यापूर्वी येऊन गेलेले चित्रपट कथानक फारसे कोणाच्या स्मरणात नाही. २००३ साली ‘हासील’ या चित्रपटाद्वारे तिग्मांशू धुलियाचे चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पदार्पण झाले होते.

या चित्रपटाचा विषयही विद्यार्थी राजकारणच होता. आता २०२३ मध्ये तिग्मांशू धुलिया याने हाच विषय घेऊन सिरीजच्या फॉरमॅटमध्ये प्रेक्षकांसमोर मांडला आहे. कदाचित ‘हासील’ चा याला सिक्वेल म्हणता येईल. नवख्या, गुणवान कलाकारांचा अभिनय ही या सिरीजची खासियत म्हणता येईल. चांगल्या विषयाला गुन्हेगारीपटाचे वळण मिळाले असले तरी उत्तर भारतातील विश्वविद्यालयातील विद्यार्थी राजकारणाचे पैलू दाखविण्याचा चांगला प्रयत्न म्हणावा लागेल.

garmi review by tushar maghade Tigmanshu Dhulia TV Series Garmi marathi Review
Garmi : 'गर्मी'नं नशीब उजळलं! कोण आहे अरविंद शुक्ला?

कथा सुरू होते, ती यूपीतील एका लालगंज या छोट्याशा शहरातून, एक प्राध्यापक आपला मुलगा अरविंदला (ओम यादव) यूपीएससी करण्यासाठी त्रिवेणीपूर (काल्पनिक शहर) येथील विश्वविद्यालयात पाठविण्याची तयारीत असतो. त्रिवेणीपूरला जाण्याची मुलाची इच्छा नसते. कुटुंबांसोबत लालगंजमध्येच राहून त्याला शिक्षण करायचे असते. पण वडिलांचा हट्ट आणि दबावापुढे त्याला झुकावे लागते. इच्छा नसतानाही आपला बोऱ्याबिस्तारा उचलून तो यूपीएससी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्रिवेणीपूर विश्‍वविद्यालयात पोचतो. तेथे छात्रसंघाचा अध्यक्ष बिंदूसिंह याच्या माणसाच्या मदतीने त्याला हॉस्टेल मिळते.

या मदतीतूनच भविष्य ठरणार आहे, पुढे काय वाढवून ठेवलंय, याची पुसटशी कल्पनाही अरविंदला नसते. हुशार, गरम डोक्याचा अरविंद अल्पावधीतच सर्वांत मिसळून जातो. दुसरीकडे छात्रसंघाचा अध्यक्ष बिंदूसिंह व उपाध्यक्ष गोविंद मौर्य या दोघांत विळा-भोपळ्याचे नाते आहे. दोघांना भविष्यात आमदारकीला उभा राहायचे आहे. दोघेही आपल्या डोक्यावर हात असलेल्या पक्षिय हायकमांडच्या आदेशावर आपली धोरण ठरवितात. ते सांगतात तशी वागतात. आखाडा चालविणाऱ्या बैरागी बाबा हा राजकारणातील तेल लावलेला पहेलवान आहे. याच्या इशाऱ्यावरच गोविंद मौर्य नाचत असतो.

भ्रष्ट, जातीय अभिमानासाठी काहीही करणारा पोलिस अधिकारी मृत्युंजय सिंह हा बिंदूसिंहचा मित्र आहे. बिंदूसिंहच्या डोक्यावर राज्यातील सत्ताधाऱ्यांचाही हात आहे. या सर्व राजकारणात आपसूकच अरविंद ओढला जातो. पुढे अरविंदचे काय होते, यासाठी नऊ इपिसोड असलेली सिरीज बघावी लागेल.

garmi review by tushar maghade Tigmanshu Dhulia TV Series Garmi marathi Review
Ajit Pawar on TDM: हे दुर्दैव, सिनेमाला लवकरात लवकर.. TDM साठी अजित पवारांनी दिला आदेश

कथेत मारधाड, शिव्या प्रत्येक दृश्‍यांगणिक आहेत. कथा तिग्मांशू धुलिया आणि कमल पांडे यांची असून, संवादही त्यांचेच आहेत. बऱ्याच संवादावर तिग्मांशू धुलियाची छाप जाणवते. दिग्दर्शनही तिग्मांशू धुलियाचेच आहे. प्रत्येक इपिसोड पाऊण तासाचा असून, नऊ भागाच्या सिरीजमधून दिग्दर्शकाने दुसरे सीझनही येणार असल्याची कल्पना शेवटच्या दृश्‍यांमधून दिली आहे.

जातीय अस्मिता, जातिवाद या बाबींना दिग्दर्शकाने ओझरता स्पर्श करून, मूळ विद्यार्थी राजकारणाला साइड ट्रॅक करून केवळ चांगल्या कथेला रिव्हेंजचे स्वरूप देऊन चांगला विषय भरकटलेल्या नावेसारखा झाला आहे. चांगला विषय असूनही ‘गरमी’ हा टिपिकल गुन्हेगारीपट असल्याचा साक्षात्कार होते. दुसरीकडे तांत्रिक बाजू, सिनेमोटोग्राफी सामान्य आहेत. छायाचित्रणाच्या कौतुक करावे, डोळे दिपावे, असा एकही दृश्‍य यात नाही.

-- तुषार माघाडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com