esakal | 'खबरी बनू नका'; सिद्धार्थच्या अंत्यविधीनंतर सेलिब्रिटींवर भडकली गौहर खान
sakal

बोलून बातमी शोधा

gauhar khan

'खबरी बनू नका'; सिद्धार्थच्या अंत्यविधीनंतर सेलिब्रिटींवर भडकली गौहर खान

sakal_logo
By
स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे Sidharth Shukla गुरुवारी निधन झाले. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. हृदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थने निधन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आज शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी स्मशानभूमीत सिद्धार्थच्या कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र- मैत्रिणी उपस्थित होते. सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्याच्या काही तासांनंतर अभिनेत्री गौहर खानने Gauahar Khan एक ट्विट केलं. सिद्धार्थच्या कुटुंबीयांचं सांत्वन केल्यानंतर माध्यमांना मुलाखती देणाऱ्यांवर तिने राग व्यक्त केला.

'सिद्धार्थच्या कुटुंबीयांचं सांत्वन केल्यानंतर बाहेर येऊन माध्यमांना त्यांच्याबद्दलची माहिती देत बसू नये. माध्यमांना मुलाखती देऊन त्याच्या कुटुंबीयांच्या बाबतीत माहिती देणाऱ्यांविषयी मला वाईट वाटतं. कृपया हे थांबवा. जर तुम्ही अंत्यविधीला गेला आहात तर बाहेर येऊन 'खबरी' बनू का', अशा शब्दांत गौहरने काही सेलिब्रिटींना सुनावलं.

हेही वाचा: शहनाजला अश्रू अनावर; सिद्धार्थ शुक्ला अनंतात विलीन

सिद्धार्थच्या अंत्यसंस्कार विधीसाठी अभिनेत्री शहनाज गिल ओशिवरा स्मशानभूमीत पोहोचली होती. यावेळी शहनाजसोबत तिचा भाऊ होता. शहनाज तिच्या गाडीत रडताना दिसली. शहनाजला सिद्धार्थच्या निधनाने खूप मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी देखील ओशिवरा स्मशानभूमीत हजेरी लावली होती. यामध्ये अली गोनी, असिम रियाज, राहुल महाजन, संभावना सेठ, विकास गुप्ता, अभिनव शुक्ला, करणवीर बोहरा, शेफारी जरीवाला यांचा समावेश होता.

loading image
go to top