
'बिग बॉस १५' विजेती तेजस्वीला गौहर खानचा टोमणा; म्हणाली..
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. या शोच्या पंधराव्या सीझनचा (Bigg Boss 15) ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने (Tejasswi Prakash) बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. एकीकडे तेजस्वीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) हिने तिच्यावर टीका केली. गौहरने ट्विट करत उघडपणे तेजस्वीविरोधात नाराजी व्यक्त केली. गौहर सुरुवातीपासूनच प्रतीक सेहजपाल याला समर्थन देत होती. त्यामुळे तोच विजेता ठरावा अशी तिची इच्छा होती.
गौहर खानचं ट्विट -
'बिग बॉसच्या विजेत्याच्या नावाची घोषणा होत असताना स्टुडिओमधील शांततेने सर्व काही स्पष्ट केलं. बिग बॉसचा विजेता एकच आहे आणि संपूर्ण जगाने त्याला चमकताना पाहिलंय. प्रतीक सेहजपाल.. तू सर्वांची मनं जिंकली आहेस. बिग बॉसच्या घरात गेलेला प्रत्येक पाहुणा तुझा चाहता आहे. लोकांना तू आवडतोस,' अशा शब्दांत गौहरने प्रतीकचं कौतुक केलं तर तेजस्वीला टोमणा मारला.
हेही वाचा: गश्मीरने का सोडली 'इमली' मालिका? अखेर समोर आलं कारण
आणखी एका ट्विटमध्ये गौहरने अभिनेत्री शमिता शेट्टीचं कौतुक केलं. रविवारी (३० जानेवारी) रात्री बिग बॉस १५ चा ग्रँड फिनाले पार पडला. तेजस्वी विजेती ठरली, तर प्रतीक उपविजेता ठरला. करण कुंद्रा तिसऱ्या स्थानी होता, तर शमिता चौथ्या स्थानी होती. निशांत भटने ग्रँड फिनालेमध्ये १० लाख रुपये स्वीकारत घरातून बाहेर पडणं पसंत केलं.
तेजस्वी प्रकाशला बिग बॉसची ट्रॉफी आणि ४० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. इतकंच नव्हे तर तिला 'नागिन ६' या मालिकेत मुख्य भूमिकासुद्धा मिळाली.
Web Title: Gauahar Takes A Dig At Tejasswi Prakash Winning Bigg Boss 15
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..