
गौहरने नुकतंच सोशल मिडियावर दोघांचे खास फोटो शेअर याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही मोजक्या आणि जवळच्या व्यक्तींच्या हजेरीतंच हा लग्नसोहळा पार पडेल.
मुंबई- अभिनेत्री गौहर खान आणि गायक इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबार लवकरंच विवाहबंधनाच अडकणार आहेत. गौहरने नुकतंच सोशल मिडियावर दोघांचे खास फोटो शेअर याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही मोजक्या आणि जवळच्या व्यक्तींच्या हजेरीतंच हा लग्नसोहळा पार पडेल.गौहरने नुकतंच सोशल मिडियावर दोघांचे खास फोटो शेअर याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही मोजक्या आणि जवळच्या व्यक्तींच्या हजेरीतंच हा लग्नसोहळा पार पडेल.
अभिनेत्री गौहर खान बॉयफ्रेंड जेद दरबारसोबत २५ डिसेंबर म्हणजेच नाताळच्या दिवशी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दोघांनी खास फोटो शेअर करत लग्नाच्या तारखेची सोशल मिडियावर घोषणा केली आहे. गौहरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जे फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये तीने लाल आणि गोल्डन रंगाचा डिझायवर गाऊन परिधान केला आहे तर जैदने कुर्ता पायजमा घातला आहे ज्यावर त्याने सुंदर जॅकेट घालून लूक तयार केला आहे. दोघेही फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. हे फोटो पोस्ट करताना गौहर खूप गोष्टी सांगत एक नोट शेअर केली आहे.
या नोटमध्ये गौहरने लिहिलंय, ''२०२० हे वर्ष सामान्य वर्षाव्यतिरिक्त काहीच नव्हतं आणि यामध्ये आमची लव्हस्टोरी असामान्य व्यतिरिक्त सगळं काही होती.'' गौहरने लिहिलंय, ''आम्हाला ही घोषणा करताना आनंद होतोय की आम्ही या लग्नबंधनात अडकून एकमेकांसोबत कायम राहून एका सुंदर आणि नवीन प्रवासाची सुरुवात करणार आहोत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता आम्ही या महत्वाच्या दिवशी केवळ कुटुंबियांसोबत छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत. आम्हाला तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वादाची गरज आहे. नेहमीच तुमचं प्रेम मिळत आलं आहे आणि त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत.''
gauhar khan and zaid darbar wedding date revealed nikaah on christmas date with boyfriend