Gaurav Taneja: युट्युबर गौरवच्या चार वर्षांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gaurav Taneja News

Gaurav Taneja: युट्युबर गौरवच्या चार वर्षांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी

Gaurav Taneja News: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या युट्युबर गौरव तनेजाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गौरवच्या चार वर्षांच्या मुलीला अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. (Social Media Viral News: गौरवनं तातडीनं पोलिसांकडे तक्रार केली असून त्याप्रकरणाची पोलिसांनी दखल घेत अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. गौरवनं आपल्याला फोनवरुन ती धमकी आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. युट्युबरनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन देखील ही माहिती दिली आहे.

गौरवच्या बाबत सांगायचे झाल्यास तो एक लोकप्रिय युट्युबर आहे. तो फ्लाईंग बीस्ट या नावानं ओळखला जातो. त्याच्या चार वर्षांच्या मुलीला फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर गौरवनं पोलिसांना त्याची माहिती दिली आहे. गौरवनं ट्विटरवरुन ही बातमी देत दिल्ली पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांना ही पोस्ट टॅग केली आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे की, माझ्या चार वर्षांच्या मुलीवरुन मला फोन आला होता. त्यामुळे मी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे.

यापूर्वी 9 जुलै रोजी गौरव त्याचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी नोएडामधील मेट्रो स्टेशनवर पोहचला होता. त्याच्या पत्नीनं एका सरप्राईज पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करुन गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. गौरवला त्याप्रकरणात अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्याला तातडीनं जामीनही मिळाला.

हेही वाचा: Video: म्हणून चित्रपटात भाषा महत्वाची असते

गौरवचं सोशल मीडियावर फ्लाईंग बिस्ट या नावानं अकाउंट आहे. इंस्टावर देखील तो लोकप्रिय आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गौरवचे तीन युट्युब चॅनल आहे. फ्लाईंग बिस्ट, फिट मसल्स टीव्ही आणि रसभरी के पापा अशी त्यांची नावं आहेत. गौरव आणि त्याची पत्नी स्टार प्लसमधील स्मार्ट जोडीमध्ये देखील सहभागी झाले होते.

हेही वाचा: Ananya Pandey आणि विजय देवरकोंडाचा मुंबईच्या लोकलमधून प्रवास, Video Viral

Web Title: Gaurav Taneja Youtuber Filed Fir His 4 Years Daughter Death Threat On Call Viral News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..