शाहरुखचा 'तो' चित्रपट सगळ्यात नावडता, गौरीला 'त्या' चित्रपटाचा येतो राग

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि गौरी खान यांच्या लग्नाला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत.
Gauri Khan Bollywood King Khan Shahrukh khan
Gauri Khan Bollywood King Khan Shahrukh khan esakal

Bollywood Movie: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि गौरी खान यांच्या लग्नाला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी म्हणून (King Shahrukh Khan) त्यांच्याकडे पाहिले जाते. भलेही आज गौरीचा मुक्काम जन्नत सारख्या मोठ्या अलिशान महलात असला तरी त्यापूर्वीचा तिचा प्रवास (Gauri Khan) खडतर होता हे अनेकांना माहिती नाही. शाहरुखसोबत तिचं लग्न हे त्यावेळी तिच्या घरातील अनेकांना मान्य नव्हते. बॉलीवूडमध्ये त्यांच्या लग्नाची (Entertainment News) चर्चा होती. रोमँटिक चित्रपटांचा किंग म्हणून शाहरुखला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळाली आहे. त्यानं यशराजसोबत केलेल्या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे दिसून आले आहे. जगभर शाहरुखचा चाहतावर्ग पसरला असला तरी, त्याची पत्नी मात्र त्याच्या चित्रपटांची अभ्यासुपणानं समीक्षा करणारी चाहती आहे.

गौरीनं एका मुलाखतीतून आपल्याला शाहरुखचे कोणते चित्रपट आवडत नाहीत त्यावर उत्तर दिलं होतं. त्याचे ते खराब चित्रपट आपण कधीही पाहिले नाहीत. असेही गौरीनं यावेळी सांगितलं आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करण नावाच्या मालिकेचा पहिला सीझन 2005 मध्ये प्रेक्षकांसमोर आला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामध्ये करणनं शाहरुखला आणि गौरीला बोलावले होते. त्यामध्ये करणनं शाहरुखचे कोणते चित्रपट आवडतात असे गौरीला विचारले होते. याशिवाय त्याच्या न आवडणाऱ्या चित्रपटांविषयी आम्हाला सांग असा प्रश्न करणनं गौरीला केला होता. मी एक प्रेक्षक म्हणून ज्यावेळी त्याचे चित्रपट पाहते तेव्हा मला त्यात काही त्रुटी आढळतात. आणि त्या मी त्याला सांगते. त्यात वाईट काहीही नाही.

Gauri Khan Bollywood King Khan Shahrukh khan
Video Viral: कंगनाचा नादच नाय! नाकाला जीभ लावून अनन्याची उडवली खिल्ली...

2002 मध्ये शाहरुखचा शक्ति - द पावर नावाचा चित्रपट आला होता. तो चित्रपट पाहिल्यावर मला शाहरुखचा कमालीचा राग आला होता. मी त्यावरुन त्याच्याशी बोलेले होते. त्या चित्रपटामध्ये शाहरुखनं खरचं खराब काम केले होते. 2002 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये संजय कपूर, नाना पाटेकर, करिश्मा कपूर, यांच्या मुख्य भूमिका होत्या. 1998 मध्ये आलेल्या तेलुगू फिल्म अंतपुरमचा रिमेक शक्ति चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.

Gauri Khan Bollywood King Khan Shahrukh khan
Video: नानांचा शेतावरच मटणाचा बेत, तांबड्या रश्श्याची चवच न्यारी!

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com