शाहरुखच्या शर्टलेस फोटोची बायकोनेच उडवली खिल्ली, चाहत्यांची तर हसून पुरती वाट... Shahrukh Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gauri Khan's Funny comment on shahrukh khan Shirtless Photo

शाहरुखच्या शर्टलेस फोटोची बायकोनेच उडवली खिल्ली, चाहत्यांची तर हसून पुरती वाट...

Shahrukh Khan Shirtless Photo Post: शाहरुख खानने रविवारी २५ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक शर्टलेस फोटो पोस्ट केला होता. या फोटोत शाहरुख आपले सिक्स पॅक्ड अॅब्ज दाखवताना दिसत आहे. त्यानं हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये आपल्या अंगातून गायब झालेल्या शर्टला एक छानसा मेसेजही लिहिला आहे.

या फोटोवर चाहत्यांनी आणि सोबत शाहरुखच्या काही जवळच्या मित्रांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण एका प्रतिक्रियेनं मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती प्रतिक्रिया होती गौरी खान हिची. शाहरुखची पत्नी गौरी खान हिनं आपल्या नवऱ्याच्याच शर्टलेस फोटोवर एक मजेशीर प्रतिक्रिया नोंदवली आहे. ज्याला वाचल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांची हसून हसून पुरती वाट लागली आहे.(Gauri Khan's Funny comment on shahrukh khan Shirtless Photo)

हेही वाचा: संतोष जुवेकरचे पूर्वा पवारशी जुळले '३६ गुण', चर्चेला उधाण...

सगळ्यात आधी जाणून घेऊया शाहरुखनं फोटोला दिलेल्या कॅप्शनविषयी. अभिनेत्यानं आपल्या शर्टलेस फोटोच्या कॅप्शनमध्ये आपल्या शर्टविषयी लिहिलं आहे की, ''तुम होती तो ऐसा होता,तुम इस बात पर हैरान होती,तुम इस बात पर कितनी हंसती,तुम होती तो ऐसा होता..मी देखील पठाण ची वाट पाहत आहे''.

शाहरुखच्या या पोस्टवर गौरी खानने खूप मजेदार प्रतिक्रिया देत लिहिलं आहे,''हे देवा, आता हे आपल्या शर्टसोबतही बोलायला लागले...''

गौरी खानच्या या प्रतिक्रियेवर शाहरुखचे चाहते मात्र भलतेच खूश झाले आहेत. काही नेटकरी तर थेट या अंदाजापर्यंत पोहोचलेत की शाहरुख गौरीला खूप पकवत असावा. तर गौरीच्या या प्रतिक्रियेनं आपली हसून हसून पुरती वाट लागली आहे असं चाहत्यांनी कबूल केलं आहे.

शाहरुखच्या पोस्टविषयी बोललं तर यावर जर्मन फुटबॉपट्टू मेसुत ओजिलने देखील कमेंट बॉक्समध्ये टाळी वाजवणारा इमोजी पोस्ट केला आहे. तर Richa Chadha ने लिहिलं आहे, 'ज्यांची लग्न होणार आहेत त्यांनी काळजी घ्या,सावधान...'

हेही वाचा: Indian Idol 13: मंचावर गळाभेट घेताना दिसल्या फाल्गुनी-नेहा,भांडण मिटलं?

फिटनेस फ्रिक टायगर श्रॉफने देखील प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की,'मी एक दिवस आराम करण्याचा विचार करत होतो आणि मग मी शाहरुखची ही पोस्ट पाहिली. महान आहेस शाहरुख तू'. अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा: Indian Idol 13: मंचावर गळाभेट घेताना दिसल्या फाल्गुनी-नेहा,भांडण मिटलं?

शाहरुखच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसला होता. नुकताच त्यानं आपल्या आगामी 'पठाण' सिनेमातला फोटो पोस्ट करत सिनेमाविषयी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमात दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम देखील आहेत. पुढील वर्षी २५ जानेवारी,२०२३ रोजी सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. त्याव्यतिरिक्त शाहरुख दक्षिणेचा प्रसिद्ध दिग्दर्शक अटलीच्या 'जवान' सिनेमात काम करत आहे. या सिनेमात नयनतारा देखील लीड भूमिकेत दिसणार आहे. तसंच, २०२३ च्या अखेरीस रीलिज होणाऱ्या राजकुमार हिरानीच्या 'डुंकी' सिनेमातही शाहरुख दिसणार आहे.