Indian Idol 13: मंचावर गळाभेट घेताना दिसल्या फाल्गुनी-नेहा,भांडण मिटलं? Falguni pathak | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Singer Falguni Pathak seen with  Neha kakkar amid fight,users get confused

Indian Idol 13: मंचावर गळाभेट घेताना दिसल्या फाल्गुनी-नेहा,भांडण मिटलं?

Falguni Pathak-Neha Kakkar Cold War: फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्या मधील भांडण अखेर मिटल्याचं समोर आलं आहे. आणि हे समोर आलं आहे इंडियन आयडॉल १३ च्या मंचावरील एका व्हिडीओमुळे. म्हणजे हा अंदाज अनेक नेटकरी लावत आहेत बरं का,आम्ही नाही. भांडणानं टोक गाठलं असताना असा व्हिडीओ पाहून आता नेटकरी संभ्रमात पडलेयत. पण नेमक काय आहे सत्य,चला जाणून घेऊया.(Singer Falguni Pathak seen with Neha kakkar amid fight,users get confused)

हेही वाचा: 'काल मला माझी दुर्गा भेटली...',नवरात्रीच्या मुहूर्तावर हेमांगीच्या पोस्टचीच चर्चा

फाल्गुनी पाठक एकीकडे नेहानं 'मैने पायल है छनकाई' गाण्याचं रीमिक्स केल्यानं तिच्यावर नाराज आहेत,त्यांनी तिला बरंच यावरनं ऐकवलं देखील आहे. त्यामध्येच आता फाल्गुनी आणि नेहा कक्कर एकमेकींसोबत एन्जॉय करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ इंडियन आयडॉल १३ च्या मंचावरचा आहे. या व्हिडीओला पाहून नेटकरी भलतेच हैराण झाले आहेत.

हेही वाचा: अहमदनगरचा जयेश खरे एका गाण्याने व्हायरल झाला अन् थेट अजय-अतुल पर्यंत पोहोचला....

सोनी टी.व्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅंडलवर इंडियन आयडॉल १३ चा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत शो ची परिक्षक नेहा कक्कर फाल्गुनी पाठकचं इंडियन आयडॉल १३ च्या मंचावर स्वागत करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की नेहा कक्कर म्हणतेय की,''आज खूप चांगला दिवस आहे.थिएटर राऊंड आहे आणि त्याची सुरुवात आपण देवी मातेच्या नामघोषानं करत आहोत,त्यापेक्षा सुंदर काही असूच शकत नाही. आणि आपल्यामध्ये प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक उपस्थित आहेत''.

हेही वाचा: 'किसी के पैर काटके अपने को लंबा नही बनना...',जॅकी श्रॉफचा अनिल कपूरना टोला?

नेहा कक्करनं फाल्गुनी पाठकची इतकी गोड ओळख करुन दिल्यानंतर गाणं तर व्हायलाच हवं होतं. आणि झालंही तसंच. फाल्गुनी पाठक आपल्या सुंदर आवाजात एक गाणं गाताना दिसत आहे. आणि मग सगळेच त्या तालावर ताल धरलेले दिसत आहेत, अगदी हिमेश आणि नेहा हे देखील गरबा खेळतात. व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं गेलं आहे की- ''नवरात्रीची सुरुवात फाल्गुनी आणि नेहासोबत''. जर हा व्हिडीओ पाहून आपल्याला वाटलं की नेहा आणि फाल्गुनीमधलं भांडण आता संपलं आहे तर तुम्ही चुकीचे आहात. कारण हा व्हिडीओ आताचा नाही,तर या एपिसोडची शूटिंग याआधीच करून ठेवण्यात आली होती. फक्त व्हिडीओला आता रिलीज करण्यात आलं आहे.

फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर मधील शीतयुद्धानंतर दोघींना एकाच मंचावर एकत्र पाहिल्यानं लोक मैत्र हैराण झालेयत. दोघींना एकत्र पाहिल्यानंतर कितीतरी नेटकरी दोघींच्या भांडणाला फेक म्हणून संबोधत आहेत. एका नेटकऱ्यानं व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं आहे- ''गाण्याला प्रसिद्ध करण्यासाठी काय-काय करतील हे खोटारडे लोक..पहिलं सोशल मीडियावर भांडून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतील,आणि मग एकत्र टी.व्ही वर परफॉर्म करताना दिसतील. सगळा दिखावा आहे नुसता''.

हेही वाचा: संतोष जुवेकरचे पूर्वा पवारशी जुळले '३६ गुण', चर्चेला उधाण...

फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर मध्ये पॅचअप झालेले नाही, आणि हे फाल्गुनीच्या नव्या पोस्टवरनं लक्षात येतंय. होय, फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्करच्या पॅचअपच्या बातम्या सुरु झाल्या असताना आता पुन्हा फाल्गुनीनं नेहावर निशाणा साधला आहे. फाल्गुनीनं नेहा कक्करच्या 'मैने पायल है छनकाई' गाण्याच्या रीमिक्स व्हर्जनचा स्क्रीनशॉट शेअर करत Dislikes दाखवले आहेत. आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे-'Dislikes पहा'.

विषय थोडक्यात इथं जरा सांगतो या भांडणामागचा- त्याचं झालं असं की नेहानं फाल्गुनीच्या 'मैने पायल है छनकाई' गाण्याचं रीमिक्स व्हर्जन केलं. पण फाल्गुनीला नेहानं तिच्या गाण्याचं बनवलेलं रीमिक्स व्हर्जन आवडलं नाही. फाल्गुनीनं नेहाला यावरनं खूप सुनावलं देखील. फाल्गुनीनं नेहाला खूप ऐकवल्यानंतर मग नेहानंही उत्तर देत म्हटलं की,'ज्या ठिकाणी मी आज आहे ते माझ्या मेहनतीच्या आणि लोकांच्या प्रेमाच्या बळावर'.