Pankhuri- Gautam: गौतम अन् पंखुरीनं ठेवलं जुळ्या मुलांचं युनिक नाव! आहे खुप रहस्यमय अर्थ

https://www.esakal.com/manoranjan/gautam-rode-and-pankhuri-awasthy-reveal-the-name-of-their-twin-babies-on-janmashtami-video-viral-vnp98
https://www.esakal.com/manoranjan/gautam-rode-and-pankhuri-awasthy-reveal-the-name-of-their-twin-babies-on-janmashtami-video-viral-vnp98Esakal
Updated on

Gautam Rode-Pankhuri Awasthy: टीव्हीवरील लोकप्रिय जोडपे गौतम रोडे आणि अभिनेत्री पंखुरी अवस्थी यांनी दिवसांपुर्वीच चाहत्यांना गोड बातमी दिली होती. गौतम आणि पंखुरी या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. त्या दिवसानंतर हे कपल आपल्या लाडक्या मुलांची झलक नेहमी चाहत्यांसोबत शेयर करत असतात.

https://www.esakal.com/manoranjan/gautam-rode-and-pankhuri-awasthy-reveal-the-name-of-their-twin-babies-on-janmashtami-video-viral-vnp98
Jawan Collection : शाहरुखचा 'गदर', पहिल्याच दिवशी सनीला फोडला घाम! कमाईत सुसाट

तर आता या जोडप्याने 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर त्याच्या मुंबईतील घरी मुलांचा नामकरण समारंभ मोठा धुमधडाक्यात आयोजित करण्यात आला. दोघांनी सोशल मीडियावर त्याच्या मुलांचे फोटो शेयर करत त्याच्या नावाची घोषणा केली. या जोडप्यांने मुलाची खुप खास नाव ठेवली आहे. या स्टार कपलने आपल्या मुलीचं नाव राध्या आणि मुलाचं नाव रादित्य ठेवलं आहे.

https://www.esakal.com/manoranjan/gautam-rode-and-pankhuri-awasthy-reveal-the-name-of-their-twin-babies-on-janmashtami-video-viral-vnp98
Jawan on OTT: या दिवशी जवान घरबसल्या पाहायला मिळणार, कधी? कोणता प्लॅटफॉर्म? वाचा एका क्लिकवर

गौतम आणि पंखुरी यांनीही या सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. यात त्यांनी या नावाचा अर्थ सांगितला आहे. त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले की, "राध्या. जी पूजेच्या योग्य आहे. तसेच राधाजींचे एक सुंदर नाव, ज्यांना हिंदू धर्मात प्रेम, कोमलता, करुणा आणि भक्तीची देवी म्हणून पूजले जाते.

त्या महालक्ष्मीचा अवतार आहे, सर्वोच्च देवी, आध्यात्मिक प्रेमाची मूर्ति आणि कृष्णाची स्त्री प्रतिरूप आणि आंतरिक शक्ती आहे. संस्कृतमध्ये त्यांच्या नावाचा अर्थ समृद्धी, यश, परिपूर्णता असा आहे. भगवान कृष्ण जगाला मंत्रमुग्ध करतात, पण राध्या त्यांनाही मंत्रमुग्ध करते!”

मुलगा रादित्यच्या नावाचा अर्थ आणि महत्त्व सांगितांना त्यांनी लिहिले की, "रादित्य म्हणजे सूर्य. रा हा प्राचीन इजिप्शियन सूर्यदेव आहे. प्राचीन धर्मातील सर्वात महत्त्वाच्या देवांपैकी एक, रा ने निर्माण केलेल्या जगाच्या सर्व भागांवर राज्य केले. आकाश, पृथ्वी आणि अंडरवर्ल्ड. असे मानले जाते की त्याने इजिप्तचा पहिला फारो म्हणून राज्य केले. संस्कृतमध्ये रा म्हणजे अग्नि आणि शक्ती.जुन्या जावानीजमधील रादित्य (इंडोनेशियातील) - ra +"

https://www.esakal.com/manoranjan/gautam-rode-and-pankhuri-awasthy-reveal-the-name-of-their-twin-babies-on-janmashtami-video-viral-vnp98
Madhuri Dixit Reaction On Jawan : 'आता मला...!' 'जवान' वर काय म्हणाली धक धक गर्ल माधुरी?

एकाच शोमध्ये काम करत असताना दोघांची जवळिक वाढली डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे 5 फेब्रुवारी 2018 रोजी विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या पाच वर्षानंतर 25 जुलैला पंखुरीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com