
Jawan First Day Collection Shah Rukh Khan Fight : बॉलीवूडच्या किंग खाननं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. शाहरुखचा जवान नावाचा चित्रपट काल देशभर प्रदर्शित झाला. त्याला पहिल्याच दिवशी विक्रमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. शाहरुखनं पुन्हा एकदा आपणच बॉक्स ऑफिसचे बाप असल्याचे दाखवून दिले आहे.
गेल्या महिन्यात सनी देओलचा गदर २ हा प्रदर्शित झाला होता. तब्बल २२ वर्षांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटानं आतापर्यत पाचशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे. अजूनही तो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मात्र आता जवान प्रदर्शित झाल्यानंतर किंग खानच्या नावाचा माहौल आहे. जवाननं पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे.
Also Read - Dahi Handi - गुंतवणुकीची उतरंड कशी हवी याचा धडा देणारा उत्सव
जवाननं पहिल्याच दिवशी ७० कोटींपेक्षा अधिक कमाई करुन बॉलीवूडचा किंग कोण आहे हे प्रेक्षकांना ठामपणे सांगितले आहे. गदरनं पहिल्या दिवशई ४० कोटींच्या आसपास कमाई केली होती. आता सोशल मीडियावर नेटकरी या दोन्ही सेलिब्रेटींची तुलना करु लागले आहेत. त्यात सनीनं बाजी मारली की शाहरुखनं असे प्रश्न नेटकरी विचारु लागले आहेत. त्यात आकडेवारीतून जवाननं गदर २ ला जोरदार टक्कर दिली आहे.
काही दिवसांपूर्वी गदर २ ची सक्सेस पार्टी झाली होती. त्यात सनीनं बॉलीवूडमधील वेगवेगळया सेलिब्रेटींना निमंत्रित केले होते. यावेळी किंग खान शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्यासहित अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. शाहरुखनं तर सनीची गळाभेट घेत त्याला खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले होते.
जवाननं अॅडव्हान्स बूकींगबाबतही वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या अॅडव्हान्स बूकींगला मागे टाकत जवाननं बाजी मारल्याचे दिसून आले आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट पठाणचेही रेकॉर्ड ब्रेक करेल. असा अंदाज ट्रेड अॅनालिस्टनं वर्तवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.