Gautami Deshpande - Virajas Kulkarni: गौतमी देशपांडे - विराजस कुलकर्णी पुन्हा एकत्र, दसऱ्याच्या मुहुर्तावर घोषणा

दसऱ्याच्या मुहुर्तावर गौतमी - विराजसच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय
gautami deshpande and virajas kulkarni in marathi natak ghalib by chinmay mandlekar after maza hoshil na
gautami deshpande and virajas kulkarni in marathi natak ghalib by chinmay mandlekar after maza hoshil naSAKAL

Gautami Deshpande - Virajas Kulkarni News: गौतमी देशपांडे - विराजस कुलकर्णी ही जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. माझा होशील ना मालिकेत दोघे झळकले.

या मालिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं. इतकंच नव्हे तर गौतमी - विराजस या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. गौतमी - विराजसच्या चाहत्यांसाठी खुशखबर. गौतमी - विराजस नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जाणुन घेऊ सविस्तर.

(gautami deshpande and virajas kulkarni in marathi natak ghalib by chinmay mandlekar after maza hoshil na)

gautami deshpande and virajas kulkarni in marathi natak ghalib by chinmay mandlekar after maza hoshil na
Jhimma 2 Teaser: "इंदूच्या ७५ व्या वाढदिवसासाठी कोण कोण येणार?" झिम्मा 2 चा धम्माल टीझर पाहाच

गौतमी - विराजस पुन्हा एकत्र

गौतमी - विराजस आगामी प्रोजेक्टमध्ये पुन्हा एकत्र येत आहेत. माझा होशील ना मालिका गाजवल्यावर हे दोघे आगामी मराठी नाटकात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

गालिब असं या नाटकाचं नाव असुन, अभिनेता चिन्मय मांडलेकरने नाटकाचं लेखन - दिग्दर्शन केलंय. या नाटकात गौतमी - विराजस प्रमुख भुमिकेत आहेत.

काय असणार नाटकाचा विषय ?

हुई मुद्दत कि 'ग़ालिब' मर गया पर याद आता है,
वो हर इक बात पर कहना कि यूँ होता तो क्या होता !

असं कॅप्शन देत या नाटकाची घोषणा करण्यात आलीय. प्रदीप मुळ्ये नाटकाचं नेपथ्य करणार असुन राहुल रानडे नाटकाच्या संगीताची धुरा सांभाळणार आहेत. या नाटकाचा विषय काय हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com