
Gautami Patil Show : गावकऱ्यांकडून गौतमीचा 'करेक्ट कार्यक्रम' गावात गौतमीला...
Gautami Patil Dancer Indapur Lavani show nimgoan: गौतमीविषयी कोणतीही बातमी असेना ती वाचकांना, तिच्या चाहत्यांना वाचायला आवडते. मराठी मनोरंजन विश्वामध्ये गौतमीचे नाव आता फेमस झाले आहे. अल्पावधीत गौतमी लाईमलाईटमध्ये आली आहे. तिच्या कार्यक्रमाच्या बाबतीतली एक महत्वाची घडामोड समोर आली आहे.
काही दिवसांरपूर्वी सांगली जिल्ह्यातील एका गावामध्ये गौतमीचा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी ज्याठिकाणी तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर एका ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती.
Also Read - Business Ideas : कमी खर्चात सुरू करता येणारा गृहउद्योग; मिळते 66 टक्के सरकारी अनुदान!
हेही वाचा: Gautami Patil : 'पण तुम्ही का जळता?' गौतमीचा कुणावर निशाणा?
गौतमीच्या कार्यक्रमांवर तिच्या अचकट विचकट डान्सवर यापूर्वी कित्येक लावणी नृत्यांगना आणि संघटनांनी सडकून टीका केली आहे. गौतमीनं वेळीच तिच्या अश्लील हावभावांचा असा डान्स थांबवला नाही तर प्रेक्षक तिला माफ करणार नाही. अशा शब्दांत तिच्यावर टीका केली होती. यावर गौतमीनं स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स घेत आपली भूमिकाही मांडली होती.
हेही वाचा: Viral News : माकड एक लाख रुपये घेऊन पळाला अन् महिला पहातच राहली, Video
आता इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी मध्ये होणारा गौतमीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काहीही झालं तरी गावात गौतमीच्या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करुन देणार नाही. अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.