Gautami Patil: बाबो, काही खरं नाही! गौतमी पाटीलचा 'खान्देश कन्या' म्हणून सन्मान.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautami Patil honored khandesh kanya award by jaykumar rawal

Gautami Patil: बाबो, काही खरं नाही! गौतमी पाटीलचा 'खान्देश कन्या' म्हणून सन्मान..

gautami patil : सध्या महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील माहीत नाही असं कुणीही नसेल. तिचे नृत्य इतके व्हायरल आणि वादग्रस्त ठरले की मंत्रालयापासून तर सामान्य माणसांच्या घराघरात हे नाव पोहोचलं. अश्लील नृत्य करते म्हणून गौतमी वर सडकून टीका झाली. काही राजकीय पक्षांनीही तिच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.

एवढेच नाही तर गौतमीचा नाच पाहून राज्यभरातील लावणी कलावंत संतापले होते. पण असे असतानाही गौतमीचा चाहतावर्ग काही कमी झालेला नाही. राज्यभरातून अनेक धनाढ्य माणसं लाखों रुपये मोडून गौतमीचा कार्यक्रम घेत आहेत.

(Gautami Patil honored khandesh kanya award by jaykumar rawal)

तिच्या नृत्यावरून सुरू झालेला वाद अद्याप ही ताजा असतानाच गौतमीला थेट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. गौतमी पश्चिम महाराष्ट्रात गाजत असली तरी ती मूळची धुळे- खान्देश इथली आहे. म्हणून खांदेशात एका भव्य कार्यक्रमात गौतमीचा 'खान्देश कन्या' म्हणून गौरव करण्यात आला.

या संदर्भात स्वतः गौतमीने एक पोस्ट केली आहे, ''माजी मंत्री तथा आमदार मा. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार मा. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते माझा खान्देश कन्या म्हणून गौरव करून सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, असाच मायेचा हात सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... जय खान्देश! असे गौतमीने म्हंटले आहे.