Gautami Patil: '...तर महिला स्टेजवरुन ओढून मारतील'! लावणी सम्राज्ञीचा संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautami Patil

Gautami Patil: '...तर महिला स्टेजवरुन ओढून मारतील'! लावणी सम्राज्ञीचा संताप

Surekha Punekar News: लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. त्याचा योग्यप्रकारे गौरव व्हायला हवा. त्याचे योग्यपद्धतीनं सादरीकरण झाले पाहिजे. आता तसे होत नाही. त्यामुळे नको ते होते आहे. आणि त्यामुळे चुकीचा पायंडा पडत असल्याचे मत प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले आहे.

आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलनं डान्स करुन प्रेक्षकांना वेडं करणाऱ्या गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्याविषयी ज्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत त्यावर तर पुणेकर यांनी प्रतिक्रिया दिली नाही ना असा प्रश्न सोशल मीडियावरुन उपस्थित केला जातोय. मात्र आपल्या प्रतिक्रियेमध्ये पुणेकर यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

पुणेकर यांनी भलेही कुणाचे नाव घेतले नसेल पण त्यांनी ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली आहे त्यावरुन त्यांचा बोलण्याचा रोख कुणाकडे आहे याचा अंदाज नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी बांधला आहे. सांगली जिल्ह्यातील एका गावात गौतमीच्या लावणीचा कार्यक्रम होता. त्यावेळी जो प्रकार घडला, तो साऱ्या महाराष्ट्रानं पाहिला. त्या कार्यक्रमाला अफाट गर्दी जमली होती. अशावेळी ज्या गावात कार्यक्रम होता तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेचं मोठं नुकसान झाले होते. कार्यक्रमात हुल्लडबाजीही पाहायला मिळाली होती. त्यावरुन गौतमी फार चर्चेत आली होती. तिची लावणी आणि तिच्या नृत्याचा अंदाज हा अनेकांना खटकला होता.

पुणेकर म्हणाल्या, जी लावणीसम्राज्ञी अंगविक्षेप करुन आपली कला सादर करते तिला लोकं सोडणार नाही. ज्या लावणी सम्राज्ञीकडे कला आहे तिला प्रोत्साहन द्या. अपुरे कपडे घालणे, आणि अश्लील वर्तन करत नाचणे त्याला लावणी म्हणत नाहीत. लावणी कलेला योग्य प्रकारे सादर गेले केले पाहिजे. नाहीतर महिला स्टेजवरुन ओढून मारतील. आताच्या लावणी सम्राज्ञींनी अश्लील डान्स सोडून भान ठेवून वागण्याची गरज असल्याचे पुणेकर यांनी म्हटले आहे. असेच जर सुरु राहिले तर महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही. या शब्दांत पुणेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

हेही वाचा: Gautami Patil: गौतमीला नाही म्हणून कसं चालेल?