
Gautami Patil New Song : पंजाबी गाण्यात गौतमीचा धुराळा, रोमँटिक अंदाजात विचारतेय 'तेरा पता!'
Gautami Patil New Punjabi Song viral social media romantic : सोशल मीडियावर सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी कोण असं विचारताच तरुणाईच्या तोंडी गौतमीचे नाव येते. सबसे कातील गौतमी पाटील हे महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रातलं सगळ्यात चर्चेतलं नावं आहे. त्याला कारणही तसेच आहे. गौतमीच्या अदांनी, स्टाईलनं चाहत्यांना वेडं केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून गौतमी भलतीच चर्चेत आली आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गौतमीचे मनोरंजनाचे कार्यक्रम होत असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. काहींनी तर तिचे कार्यक्रम गावात, शहरात होऊ द्यायचे नाही. अशीही भूमिका घेतली आहे. यामुळे गौतमी आणखी चर्चेत आली आहे. गौतमीचा डान्स हा अश्लील असून त्यामध्ये कुठेही सभ्यपणा नाही. अशी भूमिका नेटकऱ्यांनी आणि काही कलावंतांनी घेतली होती.
त्यानंतर गौतमीनं आपल्या एका मुलाखतीमध्ये माफी मागून आपल्याकडून पुन्हा असे प्रकार होणार नाहीत याविषयी सांगितले होते. याशिवाय आपल्याला लावणी येत नसून आपण ती शिकत असल्याची कबूली दिली होती. प्रेक्षकांनी काही प्रमाणात शिस्त पाळली तर बराचसा गोंधळ कमी होईल असेही तिनं सांगितले होते.
यापूर्वी गौतमीनं तिच्या एका पोस्टमधून आपलं नवीन गाणं येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता तिचे पंजाबी भाषेतील गाणं आलं आहे. त्याचे बोल तेरा पता असे आहे. त्या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मराठीत लोकप्रियता मिळवल्यानंतर पंजाबी गाण्यांमध्ये देखील गौतमी चमकताना दिसत आहे.
गौतमीच्या त्या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. तिच्या चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. आगामी काळात गौतमी एका चित्रपटामध्ये देखील दिसणार असून त्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.