गौतमी सांगून दमली, पोरं काही ऐकेना! गौतमीच्या शो मध्ये पुन्हा राडा | Gautami Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guatami Patil

Gautami Patil : गौतमी सांगून दमली, पोरं काही ऐकेना! गौतमीच्या शो मध्ये पुन्हा राडा

Guatami Patil News: सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख असलेल्या गौतमीची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. काहीही झालं तरी गौतमीच्या कार्यक्रमांना आवर्जुन हजेरी लावणाऱ्या तरुणाईला गौतमीचा डान्स पाहिल्यानंतर भलताच जोष येतो. हे दिसून आले आहे.

ज्या ठिकाणी गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम असतो तिथे हमखास गोंधळ होतोच असे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यात राज्यात जिथे गौतमीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तेथील आयोजकांना गर्दीला आवरताना नाकीनऊ आणले होते. आताही पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यामधील कवठे यमाईमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी झाली आहे.

Also Read - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Gautami Patil : आता काय बोलायचं! गौतमीवर चित्रपट, परदेशात झालं शुटिंग

कवठे येमाई या ठिकाणी गौतमी पाटील चा कार्यक्रम आयोजित केला होता. नेहमीप्रमाणे गौतमीची झलक पाहण्यासाठी अनेक तरुणांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. एका बाजूला गौतमीने नृत्य सादर करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांमधील असलेल्या तरुण मंडळींनी ठेका धरला. उत्साहाच्या नादात तरुणांकडून गोंधळ सुरु झाला. गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर देखील वायरल होतोय.

हेही वाचा: Gautami Patil: गौतमी पाटील राजकारणात येणार का? म्हणाली...

आता गौतमी पाटील ही चित्रपटामध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टनं लक्ष वेधून घेतले होते. गौतमीच्या 'घुंगरु' या सिनेमाचं शूटिंग सोलापूर, माढा, हंपी यासह परदेशातही झालं आहे. या सिनेमात गौतमी नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे अद्याप समोर आलं नाही. परंतु तिच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.