Gautami Patil : आता काय बोलायचं! गौतमीवर चित्रपट, परदेशात झालं शुटिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautami Patil

Gautami Patil : आता काय बोलायचं! गौतमीवर चित्रपट, परदेशात झालं शुटिंग

गेल्या काही दिवसांमध्ये वादात आणि चर्चेत असणार नाव म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लील नृत्यामुळे चर्चेत असलेली गौतमी आता चित्रपटात झळकणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाच नाव 'घुंगरु' असं आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे.

गौतमीच्या 'घुंगरु' या सिनेमाचं शूटिंग सोलापूर, माढा, हंपी यासह परदेशातही झालं आहे. या सिनेमात गौतमी नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे अद्याप समोर आलं नाही. परंतु तिच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. तिच्या कार्यक्रमांना आजकाल तूफान गर्दी होते. अगदी स्टेजपासून ते लांबवर लोक उभे राहून तिचे कार्यक्रम बघतात.

हे ही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

हेही वाचा: Gautami Patil Exclusive Interview: गौतमी पाटील हिने सांगितली लावणीमागील कैफियत

तिच्या कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांना तिच्या चाहत्यांना आवर घालावा लागतो. आता तिच्या येणाऱ्या चित्रपटामधून ती धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे गौतमी पाटील एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत असला तरी तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

हेही वाचा: Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; प्रेक्षकांनी चक्क...

गौतमी पाटील कोण आहे?

गौतमी पाटील सोशल मीडियावर आपल्या व्हीडिओमुळे धुमाकूळ घालत आहे. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने ती तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून ती लावणी क्वीन म्हणून तिला ओळखलं जातं. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरतिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Gautami Patil Lavani Dance Life: 'त्या' एका गाण्यामुळे गौतमीची ओळख कशी बदलली?

टॅग्स :movieAbroadmarathi lavani