
Gautami Patil : गौतमीचा गोडवा आता थाळीतही! खवय्यांसाठी खास 'गौतमी थाळी'
Gautami Patil Special Thali : कुणी काही का म्हणेना पण गौतमीचा डान्स आणि तिचं बोलणं चाहत्यांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. सध्या तर एकही दिवस असा जात नाही की गौतमीच्या नावाचा विषय चर्चेत येत नाही. सोशल मीडियावर गौतमीच्या नावाची जोरदार चर्चा होत असते. आता तर तिच्या नावाची वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे.
सोलापूर शहरातील टेंभुर्णीमध्ये एका हॉटेलमध्ये चक्क गौतमीच्या नावानं थाळी सुरु करण्यात आली आहे. त्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. गौतमीच्या नावानं हॉटेलमध्ये थाळी सुरु करण्यात आल्यानं तिच्या चाहत्यांना तर मोठा आनंद झाला आहे. यापूर्वी आपण बाहुबली थाळी ऐकली आहे. त्याचा ट्रेंड काही वर्षांपासून सुरु झाला होता. जो कुणी ती थाळी संपवेल त्याला मोठी बक्षीसेही देण्यात येत होती.
Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सांस्कृतिक विश्वात खळबळ उडवून देणारी सेलिब्रेटी म्हणून गौतमीचे नाव घेता येईल. तिच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी, त्या गर्दीमुळे निर्माण होणारा सुरक्षेचा प्रश्न, पोलिसांना होणारी डोकेदुखी यामुळे कित्येक ठिकाणी गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. इंदापूर तालुक्यातील एका गावामध्ये गौतमीच्या लावणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
हेही वाचा: Ved Movie Collection : रितेश भाऊच्या 'वेड'चा धुमाकूळ 3 दिवसांत 'एवढी' कमाई...! ठरला टॉप ओपिनिंग मुव्ही
गावकऱ्यांनी तर काहीही झालं तरी गौतमीचा कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. दुसरीकडे गौतमीच्या नावानं हॉटेलमध्ये थाळी सुरू करण्यात आल्यानं पुन्हा एकदा गौतमी चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी साम वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौतमीनं तिला चाहत्यांचे मिळणारे प्रेम, त्या प्रेमाचा होणारा अतिरेक यामुळे तिला कोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागतं याविषयी सांगितले होते.
हेही वाचा: Gautami Patil Interview : 'लोकांना कसं सांगू जशी गाणी वाजणार तशी मी नाचणार'! गौतमीची अनकट् मुलाखत वाचा
संबंधित हॉटेलचालकानं मार्केटिंगचा आगळा वेगळा फंडा म्हणून गौतमीच्या नावानं थाळी सुरु केल्याचे सांगितले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, त्या थाळीमध्ये स्पेशल डाळ फ्राय, चार बटर रोटी, गुलाबजाम, थाळीमध्ये भेंडी फ्राय, मिक्स व्हेज, सलाड यानं ती थाळी खवय्यांचे लक्ष वेधून घेत असून त्याची किंमतही वाजवी ठेवण्यात आली आहे.