‘Swades’ actor Gayatri Joshi sitting on road
‘Swades’ actor Gayatri Joshi sitting on roadesakal

Gayatri Joshi Accident : अपघात झाल्यानंतर बराच वेळ गायत्री रस्त्यावर बसून होती! 'तो' फोटो ठरतोय चर्चेचा विषय

आता गायत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर आला असून त्याबाबत चर्चा होत आहे.
Published on

‘Swades’ actor Gayatri Joshi sitting on road : प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री जोशी आणि तिचे पती विकास ऑबेरॉय यांच्या कारचा अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. त्या अपघातात दोन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. याबाबत आता गायत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर आला असून त्याबाबत चर्चा होत आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

इटलीतील एका महामार्गावर झालेल्या त्या अपघातानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची जोरदार चर्चाही सुरु झाली आहे. बॉलीवूडचा किंग खान शाहरुखसोबत स्वदेस या चित्रपटातून गायत्री प्रेक्षकांसमोर आली होती. यापूर्वी ती काही जाहिरांतीमध्य देखील चमकली होती. मात्र त्यानंतर कुटूंबासाठी वेळ देता यावा म्हणून तिनं पतीसोबत विदेशाची वाट धरली. तेव्हापासून ती बॉलीवूडच्या संपर्कात फारशी नसल्याचे दिसून आले.

Also Read - Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!

सोशल मीडियावर गायत्रीचा तो फोटो व्हायरल झाला असून त्यात ती ज्या महामार्गावर बसल्याचे दिसून येत आहे. त्या फोटोवरुन नेटकऱ्यांनी गायत्रीची विचारपूस केली आहे. तिच्याविषयी काळजीही व्यक्त केली आहे. गायत्रीचा पती विकास आणि गायत्री हे सुट्टीच्या निमित्तानं इटलीमध्ये गेले असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. ते आपल्या लॅम्बोर्गिनीनं प्रवास करत होते. त्याचवेळी त्यांच्या कारची धडक एका फेरारीला बसली होती.

‘Swades’ actor Gayatri Joshi sitting on road
Gayatri Joshi: पहिलाच सिनेमा सुपरहिट देऊन गायत्रीने का ठोकला बॉलिवूडला रामराम? हे होतं कारण

त्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी महामार्गावरील कॅमेऱ्यानं गायत्रीच्या कारच्या अपघाताचे काही फोटो टिपले आहेत. तेच आता सोशल मीडियावरही प्रसिद्ध झाले आहेत. गायत्री आणि विकास हे इटलीवरुन सर्दानियाकडे निघाले होते. त्याचवेळी हा अपघात घडल्याचे दिसून आले. त्यानंतर आता गायत्रीचे काही फोटो सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाले आहेत.

‘Swades’ actor Gayatri Joshi sitting on road
Gayatri Joshi : नागपूरच्या लेकीला थेट शाहरुखबरोबर ब्रेक कसा मिळाला? कोण आहे 'गायत्री जोशी'

मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोन लक्झुरी कार्समध्ये शर्यत लागली होती. त्यात एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचीही खूप चर्चा झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com