esakal | 'हे माझं तिसरं मूल'; करीनाने शेअर केला सोनोग्राफीचा फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

kareena kapoor

'हे माझं तिसरं मूल'; करीनाने शेअर केला सोनोग्राफीचा फोटो

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. करीना आणि सैफला यावर्षी २१ फेब्रुवारी रोजी दुसरा मुलगा झाला. करीनाचा पहिला मुलगा तैमुर नेहमी चर्चेत असतो. त्याच्यानंतर आता दुसऱ्या मुलाच्या नावाची चर्चा देखील सोशल मीडियावर होत आहे. नुकताच करीनाने सोनोग्राफीचा (Sonography) फोटो शेअर केला. त्या फोटोला करीनाने कॅप्शन दिले, 'एका अनोख्या गोष्टीवर काम करत होतो, पण तुम्हाला वाटते तसे काही नाही.' करीनाच्या सोनोग्राफीच्या फोटोला 1.58 लाख नेटकऱ्यांनी लाइक केले आहे. तर अनेकांनी कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या. हा फोटो शेअर करण्याचे कारण करीनाने एका व्हिडीओमध्ये सांगितले.(kareena kapoor shares pic of Sonography and announces her third child)

करीनाने सांगितले सोनोग्राफीच्या फोटोमागील कारण

करीनाने सोनोग्राफीचा फोटो शेअर केल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमधून करीनाने तिच्या प्रेग्नंसीच्या अनुभवावर आधारीत पुस्तकाची घोषणा केली. ही घोषणा तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून केली. या व्हिडीओवला करीनाने कॅप्शन दिले, 'माझ्या दोन्ही प्रेग्नंसीदरम्यानचा काळ आणि हे पुस्तक माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. माझ्या दोन्ही प्रेग्नंसी दरम्यान मी जे शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या अनुभवले, त्याबद्दल मी या पुस्तकत मांडले आहे. चांगले आणि वाईट असे दोन्ही दिवस असतात. काही दिवस मी काम करण्यासाठी पळत होते. तर काही दिवस मी बेडवरून उठू देखील शकत नव्हते.'

पुढे कॅप्शनमध्ये करीनाने या पुरस्काला तिचे तिसरे मुलं म्हणले आहे. करीनाने लिहिले, 'हे पुस्तक माझं तिसरं मुलं आहे, जे आज जन्माला आले. Juggernaut.in यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. मी पुस्तक वाचल्यानंतरच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहे.' 30 जून रोजी करीनाने बॉलिवूडमध्ये २१ वर्षे पूर्ण केली. लवकरच करीना 'लाल सिंग चढ्ढा' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा: पार्टीतील फोटोंमुळे गरोदर नुसरत जहां ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'ड्रग्ज घेतले का?'

हेही वाचा: करीना-सैफच्या दुसऱ्या मुलाचं ठरलं 'हे' नाव?

loading image