अभिनेत्रीचं पोस्टर पाहून हरभजन 'क्लीन बोल्ड'; वाचा भन्नाट किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harbhajan Singh

अभिनेत्रीचं पोस्टर पाहून हरभजन 'क्लीन बोल्ड'; वाचा भन्नाट किस्सा

अभिनेत्री गीता बसराने Geeta Basra २०१५ मध्ये क्रिकेटर हरभजन सिंगशी Harbhajan Singh लग्नगाठ बांधली. पण या दोघांची पहिली भेट कशी झाली हे तुम्हाला माहितीये का? हरभजनने एका चित्रपटाच्या पोस्टरवर गीताला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे, त्यावेळी गीताला हरभजन हा क्रिकेटर आहे हे माहितच नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गीताने या गोष्टीचा खुलासा केला. (Geeta Basra says Harbhajan Singh first saw her on a poster she did not know who he was)

'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या या मुलाखतीत गीता म्हणाली, "त्याने मला चित्रपटाच्या पोस्टरवर पहिल्यांदा पाहिलं आणि त्याला मी आवडली. माझ्याबद्दल जाणून घेण्याचा त्याने प्रयत्न केला. तेव्हाच माझं 'वो अजनबी' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. ही आहे तरी कोण, असा प्रश्न हरभजनला पडला होता. मी कधीच क्रिकेट पाहिलं नव्हतं. त्यामुळे हरभजन सिंग कोण आहे हे मला माहितच नव्हतं. इतकंच काय तर मला भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूंबद्दलही काही माहित नव्हतं."

हेही वाचा : 'पंतप्रधान होणार का?'; सोनूच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

गीताने २००६ मध्ये 'दिल दिया है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'वो अजनबी' हे गाणं तिच्या 'द ट्रेन' या दुसऱ्या चित्रपटातील होतं. २००७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. गीताने फार कमी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला 'लॉक' हा तिचा शेवटचा पंजाबी चित्रपट ठरला. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत काम करणं बंद केलं.

हरभजन आणि गीताने २९ ऑक्टोबर २०१५ रोजी जलंधरमध्ये लग्न केलं. या दोघांना हिनाया नावाची एक मुलगी आहे. गीता पुन्हा गरोदर असून जुलै महिन्यात त्यांच्या घरी आणखी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

Web Title: Geeta Basra Says Harbhajan Singh First Saw Her On A Poster She Did Not Know Who He

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Cricketharbhajan singh
go to top