कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर जेनेलियाची भावनिक पोस्ट

टीम ई सकाळ
Sunday, 30 August 2020

अभिनेत्री जेनेलिया डिसूजा-देशमुख हिला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तसे तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून स्पष्ट केले आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक राजकीय मंडळीसह सेलिब्रेटींनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसू येत आहे. अशात अभिनेत्री जेनेलिया डिसूजा-देशमुख हिला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तसे तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून स्पष्ट केले आहे. परंतु आता ती कोरोनाच्या आजारातून बरी झाली असून तिने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर लिहली आहे. ती पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जेनेलिया डिसूजाला (Genelia Dsouza) कोरोनाची २१ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिने कोरोनावर मात केली असून ती सध्या पूर्ण तंदुरुस्त तंदुरुस्त आहे. जेनेलियाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी तीन आठवड्यांपूर्वी कोरोना चाचणी (Coronavirus)पॉजिटिव्ह आली होती. परंतु मागील २१ दिवसांपासून मला कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळली नाहीत. देवाच्या कृपेने आज माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून मागील २१ दिवसांची कालावधी माझ्यासाठी खूप कठीण होता. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा फोन कॉलच्या माध्यमातून  डिजिटली कितीही कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा हे एकटेपण न सहन होण्यासारखे होते. मी विलगीकरणात होते आता माझ्या कुटुंबात आणि मित्रांसोबत वापस आल्याने खूप खूश आहे. तुम्हीही स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्या, चांगला आहार घ्या आणि तंदुरुस्त राहून या आजाराला पळवून लावा, असेही तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारतात आतापर्यंत भारतात ३४ लाख ६३ हजार ९७३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील २६ लाख ४८ हजार ९९९ रुग्ण कोरोनातून सावरले आहेत, त्यामूळे भारतात रुग्ण बरं होण्याच्या प्रमाणाचा टक्का ७६.४७ वर गेला आहे. सध्या भारतात एकूण ७ लाख ५२हजार९७३ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार चालू आहेत. चिंताजनक बाब म्हणजे ७ ऑगस्ट ते २९ ऑगस्टपर्यंत १४ देशात एकूण १४ लाख नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या काळात केवळ पुणे या शहरात मागील २४ तासांत ४००७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Genelia DSouza Says She Tested Positive For COVID-19 Three Weeks Ago Is Negative Now

टॉपिकस