
रितेश-जेनेलियाचा आणखी एक भन्नाट व्हिडीओ; चाहत्यांची हसून पुरती वाट...
बॉलीवूडमध्ये लग्न तर होतात पण तितक्याच वेगाने घटस्फोटही होतात. त्यामुळे खूप प्रेम करून लग्न केलेल्या जोडप्यांमध्ये पुढे प्रेम उरेल की नाही,त्यांचं लग्न टिकेल की नाही यावर मात्र सर्वसामान्यांना विश्वास ठेवणं थोडं कठीणच जातं. पण बॉलीवूडचं असं एक जोडपं आहे ज्यानं मात्र लोकांच्या या समजुतीला-विश्वासाला चुकीचं ठरवलं आहे. ते जोडपं म्हणजे मराठमोळा रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसोझा(Genelia D’Souza). या दोघांनी जेव्हा लग्न केलं तेव्हा रितेश आणि जेनेलियात तसं नऊ एक वर्षांचं अंतर. त्यात रितेश दिल से मराठी आणि जेनेलिया ख्रिश्चन धर्मीय. त्यात तिचंही करिअर फिल्म इंडस्ट्रीतलं चांगलं चाललेलं. त्यामुळे यांची संसाराची गाडी कुठपर्यंत धावेल हे तेव्हा कोणालाच ठामपणे सांगता येत नव्हतं.
हेही वाचा: कंगना सुधारली;करिनाच्या पोस्टवर केलेली कमेंट नेटक-यांना भावली...
पण जेव्हा जेनेलियानं लग्नानंतर सासरच्या राजकारणी घराण्याचा-मोठ्या नावाचा सन्मान ठेवत बॉलीवूडला रामराम ठोकला तिथेच वाटलं पोरगी देशमुख कुटुंबात रमली. त्यानंतर तिनं दोन मुलांना जन्म दिला आणि मग ब-याचदा आपल्या कुटुंबासोबतचे तिचे फोटो,मराठी सण साजरे करतानाचा तिचा उत्साह पाहून या जोडप्याने संसारात रमून दाखवलं याचा प्रत्येकाला अभिमान वाटू लागला. आज सोशल मीडियावर दोघे एकमेकांसोबत,कुटुंबासोबत वेळ घालवताना अनेक व्हिडीओ पोस्ट करीत असतात. 'कोरोनामुळे आपण लोकांना थोडासा आनंद देण्यासाठी व्हिडीओ जास्त पोस्ट करू लागलो', असं मागे रितेशनं म्हटलं होतं. बरं,त्यांचे व्हिडीओ अगदी भरपूर मनोरंजन करणारे असतात. आता असाच एक व्हिडीओ या दोघांनी पोस्ट केलाय. अगदी भन्नाट आहे की नेटिझन्सची तर हसता पुरे वाट लागली आहे. व्हिडीओ इथे बातमीत जोडला आहे.नक्की पहा.
रितेश-जेनेलियाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी 'फनी व्हिडीओ' अशी कमेंट जास्त वेळा केली आहे.
या व्हिडीओत रितेशने जेनेलियाच्या एका सवयीची टिंगल उडवली आहे. ती जेनेलियाची सवय आहे,वस्तू ठेवायच्या एकीकडे आणि शोधत बसायच्या दुसरीकडे,आणि मग सगळ्या लोकांना त्या शोधण्यासाठी भाग पाडायचं. रितेशने तिला चिडवताना तिची अॅक्टिंग करून दाखवलीय. जेनेलिया नेहमी फोन पर्समध्ये सायलेंट मोडवर ठेवते आणि मग अख्ख घर शोधते. त्यानंतर घराची चावी हरवते तेव्हाही असंच. म्हणजे ती सापडते तिच्या पर्समध्येच पण त्यामुळे त्रास लोकांना. तो व्हिडीओ शुट करत होता तेव्हा बॅकग्राऊंडला प्रसिद्द स्टॅंडअप कॉमेडियन स्टीव्ह ट्रेव्हिनो यांचा नेमका 'परफेक्ट वाईफ,नेव्हर मेक सिली मिस्टेक' या टॉपिकवर शो सुरू आहे. रितेश शूट करत असताना जेनेलियाची मात्र तोंड लपवताना पुरती वाट लागली. रितेशच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी 'फनी व्हिडीओ' म्हणत खूप छान छान कमेंट्स दिल्या आहेत.
Web Title: Genelia Hides Face In Embarrassment As Riteish Makes Fun Of Her Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..