'झिंगाट' नाचण्याच्या नादात जेनेलियाचा गेला तोल..व्हिडीओ झाला व्हायरल

Ritesh Deshmukh
Ritesh Deshmukh
Updated on

बॉलिवूडमधील रोमँटिक कपल जेनेलिया डिसुझा आणि रितेश देशमुख हे नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. कधी रोमँटिक डान्सचे तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी फिरतानाचे व्हिडिओ ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांच्या व्हिडिओला चाहत्यांची नेहमीच पसंती मिळते. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा भेटले होते. त्यानंतर काहीच दिवसात त्यांची  मैत्री झाली नंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांचे लग्न झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नुकताच  रितेशने  एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ  सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रितेश आणि जेनेलियाने नुकताच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने दोघांनी त्यांच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला रितेश आणि जेनेलियाच्या काही सेलिब्रिटी मित्रमैत्रिणी आल्या होत्या. या पार्टीमधील डान्सचा व्हिडिओ रितेशने पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये सगळे जण ‘धडक’ या चित्रपटाच्या ‘झिंगाट’ या गाण्यावर डान्स करत आहेत. नाचताना असे काही झाले की ज्यामुळे सगळे हसायला लागले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

नाचताना जेनेलिया अभिनेता आशिष चौधरीसोबत उत्साहात एक स्टेप करायला जाते तेवढ्यात जेनेलियाचा धक्का आशिषला लागला आणि ते दोघे खाली पडले. त्यामुळे सगळे हसायला लागले. ही गोष्ट जेव्हा रितेशच्या लक्षात आली तेव्हा कॅमेराकडे पाहून तो हसत होता. त्याच्या चेहऱ्यावर हे स्पष्ट दिसत आहे की तोसुद्धा आपले हसणे रोखू शकला नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत या  व्हिडीओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावर अनेकांनी विनोदी कमेंट्स लिहिल्या आहेत. तसेच कोरिओग्राफर फराह खानने देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com