Ghar Banduk Biryani: नागराज, सयाजी शिंदे, आकाश ठोसर एकत्र, 'घर बंदूक बिर्याणी'चा टीझर पाहाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ghar Banduk Biryani movie teaser out cast nagraj manjule sayaji shinde akash thosar

Ghar Banduk Biryani: नागराज, सयाजी शिंदे, आकाश ठोसर एकत्र, 'घर बंदूक बिर्याणी'चा टीझर पाहाच!

Ghar Banduk Biryani : फॅन्ड्री, सैराट, नाळ, झुंड आदी दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून समाजातील वंचितांचे प्रश्न समोर आणणारे त्यावर सडेतोडपणे भाष्य करणारे एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणजे नागराज पोपटराव मंजुळे. नागराज यांनी चित्रपट विश्वात स्वतःचे नावच केले नाही तर एक इतिहास घडवला. अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून नागराज इथवर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा 'झुंड' चित्रपट येऊन गेला. त्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आता नागराज यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. (Ghar Banduk Biryani movie teaser out cast nagraj manjule sayaji shinde akash thosar)

नागराजनं (nagraj manjule) आपल्या आगामी चित्रपटाची म्हणजे 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा दमदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमा आकाश ठोसर, सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे एक तीन भन्नाट चेहरे एकत्र दिसणार आहेत, त्यामुळे या चित्रपटाबाबत सर्वांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

'घर बंदूक बिरयाणी' या सिनेमाचा पहिला टीझर मागच्या वर्षी 2021मध्ये रिलीज झाला होता. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता पुन्हा एकदा नवा आणि धमकेदार नवा टीझर समोर आला आहे. सिनेमाचा टीझर पाहून प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

हा सिनेमा केवळ मराठी नाही तर हिंदी आणखी दोन दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या टीझर आणि पोस्टरमधून तशी घोषणा करण्यात आली आहे. सैराट नंतर पुन्हा एकदा नागराज आणि आकाश ठोसर एकत्र दिसणार आहे. झुंडमध्येही आकाश ठोसरनं छोटी भूमिका साकारली होती. मात्र सैराटनंतर नागराज आणि आकाश दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. या सिनेमाबाबतची उत्सुकता चांगलीच शिगेला गेली आहे.