बाॅलीवूडसाठी गुड न्यूज! 'गोलमाल अगेन' न्यूझीलंडमध्ये होणार पुन्हा प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 24 जून 2020

आता रोहित शेट्टीचा ब्लाॅकबस्टर हिट चित्रपट गोलमाल हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे.

मुंबई ः हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आनंदाची आणि उत्साहाची न्यूज आली आहे. न्यूझीलॅंड हा देश कोरोना मुक्त आहे आणि तेथील सरकारने चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तेथे आता रोहित शेट्टीचा ब्लाॅकबस्टर हिट चित्रपट गोलमाल हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे. कोरोना मुक्त देशामध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट आहे आणि तो २५ जून रोजी तेथे प्रदर्शित होईल. सध्या भारतातील चित्रपटगृहे बंद आहेत. अनेक चित्रपट पडदा उघडण्याची वाट पाहात आहेत आणि अशातच गोलमाल अगेन हा चित्रपट पुन्हा न्यूझीलॅंडमधील चित्रपटगृहांमध्ये झळकत आहे.

मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

रिलायन्स एंटरटेन्मेंटने या गोष्टीला पुष्टी दिली आहे आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही आपल्या इन्स्टावर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. न्यूझीलंड सरकारने चित्रपटगृहे सुरू होणार असल्याचे अधिकृतरीत्या सांगितले आहे. सध्या अनेक देशांत कोरोना रोग पसरलेला आहे. मात्र हा देश कोरोना मुक्त झाल्यावर या देशातील गोलमाल अगेन हा  चित्रपट प्रदर्शित होणार पहिला बॉलिवुड चित्रपट  ठरला आहे. गोलमाल अगेन हा विनोदी चित्रपट आहे आणि त्यामध्ये अजय देवगण, तब्बू, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, परिणीती चोप्रा, कुणाल खेमू आदी कलाकारांनी काम केले आहे. रोहितची गोलमाल सिरीज सुपरहिट आहे.  
 गोलमाल अगेन सोबतच गिप्पी ग्रेवाल यांची 2019  मध्ये आलेली "अरदास करा" हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for Bollywood! Golmaal Again will be screened again in New Zealand