good bye : 'ब्रह्मास्त्र'नंतर अमिताभ बच्चन करणार 'गुडबाय'.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GoodBye movie Amitabh Bachchan  Rashmika Mandanna family Drama movie will release on Oct 7

good bye : 'ब्रह्मास्त्र'नंतर अमिताभ बच्चन करणार 'गुडबाय'..

amitabh bachchan : अमिताभ बच्चन यांची भाषाशैली, त्यांचे शब्दांवरील प्रभुत्व अवघ्या जगाला ठाऊक आहे. ते आपल्या चाहत्यांशीही अशाच मधुर शब्दात संवाद साधत असतात. सोशल मिडियावर ते बऱ्यापैकी चाहत्यांशी जोडलेले आहेत. एवढेच नाही तर (Amitabh bachchan) अमिताभ वयाच्या 79 व्या वर्षीही काममध्ये स्वतःला झोकून दिलेले दिसतात. सध्या ते कोण बनेगा करोडपतीच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत, शिवाय त्यांचा 'ब्रह्मास्त्र' हा बहुचर्चित चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. अशातच त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे.

(GoodBye movie Amitabh Bachchan Rashmika Mandanna family Drama movie will release on Oct 7)

अमिताभ बच्चन यांचा 'गुडबाय'(Goodbye) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचतील एक फोटो नुकताच समोर आला आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर ही निर्मिती संस्था करणार असून निर्मात्यांनी अधिकृत ट्विटर खात्यावरून याची घोषणा केली आहे. पोस्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार हा सिनेमा ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. महत्वाचं म्हणजे, या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (rashmika mandana)म्हणजे सर्वांना परिचित असलेली श्रीवल्ली देखील दिसणार आहेत. या दोघांशिवाय नीना गुप्ता, एली अवराम, सुनील ग्रोव्हर आणि साहिल मेहता हे देखील सिनेमात आहेत. (good bye movie)

'गुडबाय' हा सिनेमा एक फॅमिली ड्रामा आहे. यात कुटुंब आणि नातेसंबंधांची हृदयस्पर्शी कथा दाखवण्यात आली आहे. विकास बहल दिग्दर्शित हा सिनेमा बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी तयार केलेला हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Goodbye Movie Amitabh Bachchan Rashmika Mandanna Family Drama Movie Will Release On Oct 7

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..