Goshta eka paithanichi: बहुचर्चित 'गोष्ट एका पैठणीची' या दिवशी होणार प्रदर्शित.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Goshta eka paithanichi national award winning marathi movie will release on 2 december cast sayali sanjeev suvrat joshi

Goshta eka paithanichi: बहुचर्चित 'गोष्ट एका पैठणीची' या दिवशी होणार प्रदर्शित..

marathi movie: ६८व्या राष्ट्रीय पुरस्कारात शंतनू रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची'ने 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा पुरस्कार पटकावला असून आज 30 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हाच चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पण अखेरी तो क्षण आलेला आहे. आजच्या खास दिनाचे औचित्य साधून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. (Goshta eka paithanichi national award winning marathi movie will release on 2 december cast sayali sanjeev suvrat joshi)

येत्या २ डिसेंबर रोजी ‘गोष्ट एका पैठणीची चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटात सायली संजीव (sayali sanjeev) , सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल दिग्दर्शक शंतनू रोडे म्हणतात, '' आज या चित्रपटासाठी आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाची तारीख जाहीर करण्यासाठी आजच्यापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असूच शकत नाही. हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. एका छोट्याशा गावात घडणारी ही गोड कथा आहे. चित्रपट बनवला तेव्हा हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारेल, याची जराही कल्पना नव्हती. प्रत्येक जण आपल्या उराशी एक स्वप्न बाळगून असतो आणि त्या स्वप्नांनाची पूर्तता करणारा हा नक्षीदार प्रवास म्हणजे 'गोष्ट एका पैठणीची'. खरंतर या चित्रपटाचा भाग असलेला प्रत्येक व्यक्ती या पुरस्काराचा मानकरी आहे. ‘’