esakal | नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन

मदर्स डे, वन रूम कीचन, दुधावरची साय, चाॅईस इज युवर्स, यू टर्न, हिमालयाची सावली अशा काही नाटकांची निर्मिती करणारे नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे आज सकाळी ब्रेन हॅमरेजने बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे - सकाळ न्युज नेटवर्क

मुंबई ः मदर्स डे, वन रूम कीचन, दुधावरची साय, चाॅईस इज युवर्स, यू टर्न, हिमालयाची सावली अशा काही नाटकांची निर्मिती करणारे नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे आज सकाळी ब्रेन हॅमरेजने बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी तसेच एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

नेटक लाईव्ह! ऋषिकेश जोशी यांचा मराठी रंगभूमीवरील आगळा वेगळा प्रयोग..

गोविंद चव्हाण हे बोरिवली येथे राहात होते. काल दुपारी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र आज सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले, अशी माहिती हिमालयाची सावली या नाटकाचा दिग्दर्शक राजेश देशपांडेने दिली. अत्यंत मननिळावू आणि सतत हसरा चेहरा असणारे गोविंद चव्हाण यांनी अनेकांना मदतही केलीआहे. यू टर्न हे आनंद म्हसवेकर लिखित व दिग्दर्शित त्यांचे नाटक कमालीचे गाजले. सध्या रंगभूमीवर त्यांची निर्मिती असलेले हिमालयाची सावली हे नाटक चांगले गाजत होते. अभिनेता शरद पोंक्षे यांनी यामध्ये मुख्य भूमिका केली आहे. 

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image