खुलासा ! गोविंदाचे बिघडलेय मानसिक संतुलन

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मुंबई : गोविंदा सध्या त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. त्याला काही दिवसांपूर्वी नेटिझन्सनीही ट्रोल केलं होतं. आपल्या वक्तव्यामध्ये गोविंदाने म्हटलं होतं की, 2009 मध्ये हॉलिवूडपट अवतारचे दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी गोविंदाला विचारले होते. मात्र गोविंदाने हा सिनेमा करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

नकार देण्याचं कारण देताना त्याने म्हटलं होतं की, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तो 410 दिवस देऊ शकत नाही. याशिवाय स्वतःच्या शरिरावर त्याला पेंट करून घ्यायचं नव्हतं. या कारणामुळे त्याने अवतार सिनेमात काम करायला नकार दिला होता. याशिवाय त्याने दिग्दर्शक डेविड धवन यांच्याविरुद्ध दुखावणारे विधान केले. यामुळेही सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. आता गोविंदाच्या मित्राने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

गोविंदाने मुलाखतीत म्हटलं होतं की जेम्स कॅमरून यांना अवतार या सिनेमाचं टायटल त्यानेच सांगितलं होतं. मात्र, गोविंदाच्या अनेक मित्रांच्या म्हणण्यानुसार, त्याला कोणतातरी मानसिक आजार असून त्याला मदतीची गरज असल्याचे समोर येत आहे. मानसिक आजारामुळेच तो अशी वक्तव्य करत असल्याचा खुलासा त्याच्या मित्रांकडून करण्यात येत आहे.

अनेक जणांच्या सांगण्यानुसार, गोविंदाचं मित्रांसोबतचं वागणंही बदललं आहे. यामुळे सिनेसृष्टीत आज त्याचे कोणीही मित्र नाहीत आणि त्याच्या मदतीसाठीही कोणी पुढे येत नाही. गोविंदाच्या मित्राचा हा खुलासा नक्कीच धक्कादायक आहे. त्याच्या या बोलण्यात किती तथ्य आहे हे अजून स्पष्ट झाले नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: govinda is struggling with mental problem claims his friend