ग्रेसी बनणार ‘संतोषी माँ’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

 ‘लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘तुफान’ यांसारख्या चित्रपटांतून अभिनेत्री ग्रेसी सिंग प्रेक्षकांसमोर आली होती.

मुंबई : ‘लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘तुफान’ यांसारख्या चित्रपटांतून अभिनेत्री ग्रेसी सिंग प्रेक्षकांसमोर आली. आता लवकरच ती  ‘संतोषी माँ- सुनाए व्रत कथाएं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ग्रेसी ‘संतोषी माँ’ची मुख्य भूमिका साकारणार आहे. 

याबद्दल ग्रेसी सांगते, ‘यापूर्वीही मी संतोषी मातेची भूमिका साकारली आहे आणि आता पुन्हा तीच भूमिका मला साकारायला मिळतेय याचा आनंद आहे. अशा भूमिका साकारताना बऱ्याच आव्हानांना सामोर जावं लागतं. आणि अशा प्रकारच्या भूमिका साकरताना खूप सकारात्मकता मिळते.’

web title : Gracie will play godess role 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gracie will play godess role