Grammy Awards 2024 : झाकीर हुसैन यांनी मोदींना हरवलं, पण 'ग्रॅमी' सोहळ्यात चर्चा फक्त पंतप्रधान मोदींच्या गाण्याची!

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये संगीत क्षेत्रातील मानाचा ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला आहे.
Grammy awards 2024
Grammy awards 2024esakal

Grammy awards 2024 : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये संगीत क्षेत्रातील मानाचा ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला आहे. यावेळी भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज संगीतकार, गायक, वादक यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यात शंकर महादेवन, उस्ताद झाकीर हुसैन यांच्या नावाची चर्चा आहे.

यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका गाण्याला देखील नामांकन मिळाले होते. मात्र त्याला कोणताही पुरस्कार मिळाला नाही, पण त्या गाण्याची जोरदार चर्चा दिसून आली. त्याचे सादरीकरणही चर्चेत होती. यावर्षी उस्ताद झाकीर हुसैन, शंकर महादेवन आणि राकेश चौरासिया यांना ग्रॅमी पुरस्कारानं गौरविण्यात आल्याचे दिसून आले आहे. यानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

प्रसिद्ध गायिका टेलल स्विफ्टनं तिच्या करिअरमधील १३ वे ग्रॅमी मिळवलं आहे. २०२४ मध्ये तिच्या नावाचा दबदबा दिसून आला. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या पोस्ट शेयर करत तिची प्रशंसा केली आहे. यंदाच्या सोहळ्यात फिमेल सिंगर्सची सरशी झाल्याचे दिसून आले आहे. एकीकडे मायली सायरसनं तिच्या करिअरमधील पहिलं ग्रॅमी मिळवलं तर एसजेएला तब्बल ९ नामांकनं होती.

एसजेडए यावर्षीच्या सोहळ्यात सगळ्यात टॉपवर होती. संगीताच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कलाकारांना संयुक्त अमेरिकेच्या वतीनं ग्रॅमी पुरस्काराचे वितरण केले जाते. भारतातील चारपेक्षा अधिक कलाकारांना यावेळी ग्रॅमी पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. यावेळचा ग्रॅमी सोहळा हा नोवानं होस्ट केला होता. तिनं यापूर्वी तीनवेळा हा शो होस्ट केला आहे.

Grammy awards 2024
Grammy Awards 2024 : गौरवास्पद! शंकर महादेवन, झाकीर हुसेन यांनी जिंकला ग्रॅमी; येथे वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

भारतीयांसाठी आनंदाचा क्षण...

यंदाच्या वर्षी भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ग्रॅमीमध्ये भारतीय गायक आणि वादक यांचा दबदबा असल्याचे दिसून आले आहे. शंकर महादेवन यांच्यासह आणि चार संगीतकारांना ग्रॅमीनं गौरविण्यात आलं आहे. ग्रॅमी २०२४च्या ग्लोबल साँग कॅटगिरीमध्ये पीएम मोदी यांच्या एंबेडस इन मिलेटस नावाच्या गाण्याला नामांकन मिळाले होते.

पीएम मोदी यांनी हे गाणं फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांच्यासोबत लिहिले होते. हे गाणं पटायातील एका क्लबमध्ये देखील दाखवण्यात आल्याचे दिसून आले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या गाण्याला भारत सरकारच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं २०२३ च्या इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स घोषित करण्यासाठी तयार केलं गेलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com